शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus:हाताला काम नाही, खायलाही पैसे नाहीत! मुंबईत राहून करणार काय? पायी गाव गाठणाऱ्या मजुरांची उद्विग्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:29 IST

मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही.

- जितेंद्र कालेकर  ठाणे -  हाताला काम नाही आणि दोन वेळचे खायलाही पैसे नाहीत... मग मुंबईत राहून करायचे काय? यदाकदाचित कोरोनासारखा आजार झालाच तर निदान आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल, अशी उद्वीग्नता मुंबईतून ठाणेमार्गे पायीच उत्तरप्रदेशातील गाव गाठण्यासाठी निघालेल्या एका गटाने ‘लोकमत’जवळ शनिवारी रात्री व्यक्त केली.मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही. पण, इथे होणाºया हालअपेष्टांपेक्षा पायी जाऊन, थोडे हाल आणखी सोसून आपले मूळ गाव गाठू, असे या मजुरांचे म्हणणे आहे. लिफ्टच्या फिटिंगचे काम करणारा राजू गौतम (२४, रा. मानखूर्द, मुंबई) हा त्यांच्यापैकीच एक. त्याचाच आणखी एक नातलग कप्तान गौतम (२४) हा पत्नी आशादेवी (२२) तसेच संध्या (३) आणि अंशू (२) ही दोन मुले आणि मनिषकुमार (२२) या भावासह हा प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला काम नाही. त्यात जवळचे सर्व पैसे संपले आहेत. काम शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर पोलिसांचा मार खावा लागला, राजू आपली कैफियत मांडत होता. संसर्ग झालाच तर इथे मरण्यापेक्षा, तिकडे जाऊन आजाराशी लढा देत कुटूंबियांजवळ मरण आले तरी चालेल, असे मत कप्तान याने व्यक्त केले.एक दोन किलोचे धान्य सुरुवातीला काही दिवस काही सामाजिक संस्थांकडून मिळाले, पण त्यावरही किती दिवस काढणार? असाही प्रश्न आहे. गावीच काहीतरी कामधंदा करु, अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली.ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन मार्गावरुन नाशिकच्या दिशेने जाणाºया आणखी एका गटातील फुले रावत (२६, रा. रे रोड, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश) म्हणाला, गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत राहतो.मुंबईत कपड्याच्या मार्केटींगचे तो काम करतो. दोन महिने गावाहून पैसे मागवून आणि कर्ज काढून दिवस काढले. आता मिळकत काहीच नाही. मग जगणार कसे, असा त्याचा प्रश्न आहे. सूरजकुमार (३५, रा. दारुखाना, मुंबई, मूळ गोंडा (उत्तरप्रदेश) हा दहा वर्षांपासून टॅक्सी चालवितो. तो ७ मेपासून पायीच घराबाहेर पडला.सूरजकुमार तिवारी याच्यासह रामसुरेश तिवारी, उमाकांत तिवारी, रामदेव शुक्ला, हणमंतलाल तिवारी, शिवनाथ तिवारी अशा सहा जणांच्या गटाने प्रवास करीत आहेत.रोज १५ ते २० किलोमीटर प्रवासानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मार्गस्थ व्हायचे, असा त्यांचा दिनक्रम आहे. केंद्र आणि राज्य शासनाने किमान लहान मुले, महिला आणि अपंग यांच्याकडे पाहून तरी आमच्या घरी जाण्यासाठी सुटसुटीत नियम करावेत.रीतसर गावी जाण्यासाठी शिवडी पोलिसांकडेही अर्ज केला. पण, जाचक नियमांमुळे काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनेही या मजुरांना विनाअट स्वीकारले पाहिजे, अशीही माफक अपेक्षा या मजुरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे