CoronaVirus News: बदलापूरमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 01:38 IST2020-05-02T01:38:01+5:302020-05-02T01:38:05+5:30
तर एका रुग्णाला ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली आहे.

CoronaVirus News: बदलापूरमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण
बदलापूर : बदलापूरमध्ये शुक्रवारी कोरोनाचे ३ नवे रुग्ण आढळले. त्यातील दोघांवर मुंबईतच उपचार सुरु आहेत. तर एका रुग्णाला ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली आहे. शुक्रवारी सापडलेले रुग्ण हे कात्रप, बेलवली आणि शांतीनगर भागातील आहेत. कात्रप विभागात सापडलेल्या रुग्णावर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बेलवली येथील रुग्ण हा अंधेरीमध्ये उपचार घेत आहे. तसेच शांतीनगर भागातील रुग्ण हा मुंबईतच उपचार घेऊन पुन्हा बदलापूरला घरी आला आल्याची माहिती सूत्रांनी दिली.