शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Thane: कोरोनाग्रस्त पोलिसांच्या उपचाराची लाखोंची बिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:42 IST

राज्य शासनाने कोविड रुग्णालयांचाही पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये तातडीने समावेश करण्याची गरज आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : कोरोनावर उपचार करणाऱ्या अनेक खासगी रुग्णालयांचा पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत राज्य शासनाने समावेश केलेला नाही. त्यामुळे या आजाराशी लढा दिल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेक पोलिसांच्या हातात लाखोंची बिले येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कोविड रुग्णालयांचाही पोलीस कुटूंब आरोग्य योजनेमध्ये तातडीने समावेश करण्याची गरज आहे.रस्त्यावर विनाकारण फिरणाºया लोकांवर कारवाई करताकरता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह २३ पोलीस कर्मचाºयांचा समावेश आहे. मुंबईतही कोरोनाची लागण झाल्यामुळे तीन पोलिसांचा मृत्यू झाला.दरम्यान, ठाण्यात कळवा येथील सफायर या खासगी रुग्णालयातून अलिकडेच कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परतलेल्या पोलीस कर्मचाºयाला २0 हजारांच्या अनामत रकमेसह एक लाखांच्या बिलाचा भरावे लागले. पोलीस आरोग्य योजना किंवा मेडिक्लेममध्येही या आजाराचा समावेश केलेला नसल्याने हे बिल तुम्हाला भरावेच लागेल, असेही या कर्मचाºयाला सुनावण्यात आले. या कर्मचाºयासह अनेकांना अशाच प्रकारे ९0 हजारांपासून ते दीड लाखांच्या घरात रुग्णालयाची बिले आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. १५ एप्रिल रोजी दाखल केलेल्या या कर्मचाºयाला १४ दिवसांपैकी पाच दिवस केवळ काही टॅबलेट देण्यात आल्या. या काळात त्याला व्हेंटिलेटरचीही गरज भासली नाही. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल आकारले गेले. कर्तव्य बजावताना पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.राज्य शासनाने विविध योजनेंतर्गत पोलीस कुटूंब आरोग्य योजनेत कळव्यातील सफायर, ठाण्यातील होरायझन तसेच राज्यभरातील अनेक रुग्णालयांचा समावेश केलेला नसल्याने पोलिसांना लाखोंची बिले भरावी लागत आहेत. ठाण्यात केवळ ज्युपीटर रुग्णालयाचा तसेच अगदी दोन दिवसांपूर्वी घोडबंदर रोडवरील वेदांत रुग्णालयाचा समावेश केला आहे. त्यातील केवळ वेदांतचा समावेश कोविडमध्ये आहे.

आरोग्याचा गंभीरपणे विचार करावापोलीस कुटूंब आरोग्य योजनेत ८५ प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. त्यात या आजाराचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. ठाण्यातील ज्युपिटर आणि वेदांतप्रमाणे सफायर, होरायझन तसेच राज्यभरातील अन्यही कोविड रुग्णालयांचा यात समावेश करण्याचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. पोलिसांच्या आरोग्याच्या विषयावर शासनाने गांभिर्याने विचार करण्याची मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस