शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मार्केट वगळता ठाणेकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:31 IST

CoronaVirus News in Thane : ठाणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजाराहून अधिक झाली आहे. तसेच मृतांची संख्या देखील 326 हून अधिक झाली आहे.

ठळक मुद्देकोरोनाला अटकाव करण्यासाठी 2 ते 12 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. भाजी मार्केट सकाळी 11 तर किराणा मालाची दुकाने दुपारी 1 वाजेर्पयत सुरु होती. त्यामुळे जांभळी मार्केटमध्ये नागरीकांनी पुन्हा गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.

ठाणे : ठाणे  शहरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने गुरुवारपासून पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यानुसार अंतर्गत रस्तेही बंद होते, केवळ मुख्यमार्ग सुरु होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, तर टीएमटी बसमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता. दुसरीकडे, सर्व बंद करण्याचा निर्णय असताना जांभळी नाका आणि इंदिरा नगर येथील मार्केट 1 वाजेपर्यंत सुरु होते. त्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात याठिकाणी गर्दी दिसून येत होती. तर ठिकठिकाणी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केले जात होते.

ठाणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 हजाराहून अधिक झाली आहे. तसेच मृतांची संख्या देखील 326 हून अधिक झाली आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यासाठी 2 ते 12 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या कालावधीत शहरातील सर्वच आस्थापना बंद असतील असे सुरवातीला सांगितले गेले होते. परंतु बुधवारी सांयकाळी झालेल्या बैठकीनंतर जांभळी नाका येथील मुख्य बाजारपेठ सकाळी सुरु होती. तसेच इंदिरा नगर येथील मार्केटही सुरु ठेवण्यात आले होते. 

भाजी मार्केट सकाळी 11 तर किराणा मालाची दुकाने दुपारी 1 वाजेर्पयत सुरु होती. त्यामुळे जांभळी मार्केटमध्ये नागरीकांनी पुन्हा गर्दी केल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे पोलिसांकडून वांरवार नागरीकांना लाऊडस्पीकरवरुन घरी जाण्याचे आवाहन केले जात होते. तसेच वेळ झाल्यानंतर दुकाने बंद करण्याच्या सुचनाही दिल्या जात होत्या. तर इंदिरा नगरच्या मार्केटमध्येही नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे या दोन मार्केटला एक न्याय आणि इतर दुकानदार आणि मार्केटला दुसरा न्याय का असा सवाल अनेक व्यापा-यांनी उपस्थित केला आहे. 

प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन सांगितले असतांना आम्ही त्याला सहकार्य केले आहे. परंतु प्रशासनाकूडनच जर अशा पध्दतीने अन्याय होत असेल तर कोरोनाला रोखण्यात प्रशासन कसे यशस्वी होईल असा सवाल काही व्यापारी आणि दुकानदारांनी उपस्थित केला आहे.दरम्यान दुसरीकडे शहरातील रस्त्यावरील वाहतुक रेंगाळली होती. अंतर्गत रस्ते बंद होते. शहरातील मुख्य चौकात वाहतुक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच आनंद नगर चेकनाका येथेही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यावश्कय सेवेतील नागरीकांनाच ये जा करण्याची मुबा दिली जात होती. तर शहरात ऑटो, टॅक्सी तसेच खाजगी वाहने देखील बंद होती. 

महापालिकेच्या परिवहन सेवेच्या रोज 120 च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत होत्या, परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ 55 बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. त्या देखील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठीच चालविण्यात येत होत्या. इतर नागरीक बसमध्ये चढल्यास त्याला उतरविले जात होते. परंतु बेस्टच्या बसेसमध्ये सर्वाना प्रवेश दिला जात होता. एकूणच मार्केट परिसर वगळता इतर ठिकाणी कडकडीत बंद दिसून आला.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस