शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:46 IST

विनाकारण घराबाहेर पडणा-या तसेच लॉकडाऊनचे नियम धुडकावणा-या तब्बल दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ युनिटच्या माध्यमातून गुरुवारी एकाच दिवसात कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देठाणे शहर वाहतूक शखेची कारवाई१३ लाख नऊ हजरांचा दंड वसूल ३१६ वाहने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लॉकडाऊनचे नियम सर्रास तोडणा-या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील तब्बल दोन हजार ७४४ वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून १३ लाख नऊ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ३१६ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दोन दिवसांपूर्वी आवाहन केले होते की, २ ते १२ जुलै दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या क्षेत्रात कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. या काळात अत्यावश्यक तसेच वैद्यकीय कामाव्यतिरिक्त कोणीही आपली वाहने रस्त्यावर आणू नयेत. तरीही २ जुलै रोजी सकाळपासून वाहने रस्त्यावर आणणाºया दोन हजार ७४४ चालकांवर वाहतूक शाखेच्या विविध पथकांनी कारवाई केली. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात ११८१ वाहन चालकांकडून पाच लाख ९३ हजारांचा दंड ई चलनाद्वारे वसूल करण्यात आला. तर भिवंडीमध्ये ७३३ वाहने तीन लाख २१ हजार ४०० रुपयांचा दंड, कल्याण डोंबिवलीमध्ये २८४ वाहने- एक लाख २८ हजार ८०० रुपयांचा दंड, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या क्षेत्रात २३७ वाहने- एका लाख १७ हजार २०० रुपयांचा दंड तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील ३०९ चालकांकडून एक लाख ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.* दरम्यान, २ जुलै रोजी सपूर्ण दिवसभरात वाहतूकीचे तसेच सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळणा-या ३१६ चालकांची वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये २४९ मोटारसायकली, ४५ रिक्षा आणि ११ मोटारकारचा समावेश आहे. नारपोलीमध्ये सर्वाधिक ४८, उल्हासनगरमध्ये ३१ तर वागळे इस्टेटमध्ये २७ दुचाकी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस