शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News in Thane : शासकीय रुग्णालयात झोपडपट्टीतील रुग्णांची परवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 23:45 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : शहरातील एकाच खाजगी रुग्णालयात सध्या अशा रुग्णांना घेतले जात आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी पैशांअभावी जाता येणे शक्य नसल्याने त्यांचे हाल सुरूझाले आहेत.

- अजित मांडके ।ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधितांसह आता झोपडपट्टीतील इतर आजारांच्या रुग्णांचेदेखील हाल होत आहेत. श्रीमंतवर्गाला खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे शक्य होत आहे. मात्र, साधा ताप आला तरी सामान्यांना महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहरातील एकाच खाजगी रुग्णालयात सध्या अशा रुग्णांना घेतले जात आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी पैशांअभावी जाता येणे शक्य नसल्याने त्यांचे हाल सुरूझाले आहेत. यातूनच, शहरात आठवडाभरात दोघांचे मृत्यूही ओढवल्याची गंभीर बाब समोर आली आहे.शहरात आजघडीला १३०० च्या पार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेने आरक्षित केलेल्या रुग्णालयातील खाटांची क्षमताही संपुष्टात येऊ लागली आहे. दुसरीकडे आता झोपडपट्टी भागात तापाचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. येथील रुग्णाला यासाठी एकतर महापालिकेचे कळवा रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय रुग्णालय हे दोनच पर्याय शिल्लक आहेत. परंतु, त्या ठिकाणी तपासणीसाठी गेले असता, पहिला तुमचा कोरोनाचा रिपोर्ट आणा, मगच तुम्हाला दाखल करू घेऊ, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे नाइलाजाने ते न तपासता घरी येत आहेत. भीती म्हणा किंवा कामधंदा बंद असल्याने उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांना महागडी कोरोना टेस्ट करणेही शक्य होत नाही. त्यामुळे हे आजारपण घरीच काढले जात आहे. एखाद्याची प्रकृती जास्तीच खालावली, तर त्याला अखेर रुग्णालयात हलविले जात आहे. परंतु, तोपर्यंत तो अनेकांच्या संपर्कात येऊन इतरांनादेखील त्याची बाधा होऊन झोपडपट्टीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यातूनच मागील आठवड्यात वागळे इस्टेट भागातील एका ६० वर्षीय व्यक्तीला ताप येत होता. त्यामुळे त्याने कळवा रुग्णालयात धाव घेतली. परंतु, त्याठिकाणची गर्दी पाहून आणि तेथे दाखल करून घेतले जात नसल्याने त्याने घरचा रस्ता निवडला. आपल्याला कोरोना तर झाला नाही ना? या भीतीपोटी त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे यातूनच समोर आले.मंगळवारी असाच प्रकार ठाण्यातील वागळे इस्टेटच्या शिवाजीनगरमध्ये घडला असून तापाच्या रुग्णाला दाखल करून न घेतल्याने अखेर त्याचा रस्त्यावर तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली.झोपडपट्टीतील तापाच्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी मी महापौर म्हणून मागील १५ दिवसा ंपासून प्रशासनाकडे करीत आहे. मात्र, त्याबाबत अद्यापही ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे तेथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यावर ठोस उपाययोजना करावी.- नरेश म्हस्के,महापौर, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे