शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News:ठाण्यात आणखी एका अधिकाऱ्यासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

By जितेंद्र कालेकर | Updated: June 15, 2020 22:39 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यासह वेगवेगळया ठिकाणच्या एका अधिकाºयासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवारी समोर आली. दरम्यान, आतापर्यंत २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असली तरी तब्बल १९३ पोलीस कोरोनातून मुक्त झाले आहेत. कोरानातून बरे होण्याची संख्याही लक्षणीय आहे.

ठळक मुद्दे आतापर्यंत २६ अधिकाऱ्यांसह २७५ पोलीस बाधितकोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढले१९३ पोलिसांनी केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या आणखी एका सहायक पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. आतापर्यंत २६ अधिकाºयांसह २७५ पोलीस बाधित झाले असून तब्बल १९३ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही पोलिसांमध्ये अधिक असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.लॉकडाऊनचे नियम आता मोठया प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचा बंदोबस्तही मोठया प्रमाणात कमी केला आहे. तरीही दाटीवाटीची वस्ती तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय असलेल्या भागातील पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याची बाब समोर आली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे एक सहायक पोलीस निरीक्षक यांनाही १३ जून रोजी त्रास झाल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना निआॅन रुग्णालयात दाखल केले आहे. बाजूच्याच डायघर पोलीस ठाण्यातील एक पोलीस हवालदार दोन पोलीस नाईक अशा तीन कर्मचाºयांनाही १३ जून रोजी निआॅन रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याआधी राबोडी पोलीस ठाण्यातील हवालदार आणि उल्हासनगरच्या नियंत्रण कक्षातील एका महिला कर्मचा-याचाही १२ जून रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही वेववेगळया रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या सहा पोलिसांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांचीही माहिती घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.* आतापर्यंत २६ पोलीस अधिकारी आणि २४९ कर्मचारी अशा २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. सध्या सहा अधिकारी आणि ७४ कर्मचारी अशा ८० पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तब्बल २० अधिकारी आणि १७३ कर्मचारी अशा १९३ पोलिसांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण चांगले असल्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस