शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: धक्कादायक: बाहेर फिरण्यास विरोध केल्याने क्वारंटाईन व्यक्तीने केली दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:21 IST

ठाण्याच्या कळवा भागातील एका कोरोनाग्रस्ताच्या कुटूंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरीही या कुटूंबियांपैकी एकजण घराबाहेर फिरत असतांना त्याला या सोसायटीतील रहिवाशाने हटकल्यानंतर त्याच्यावरच त्याने दगडफेक करीत शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. आता याप्रकरणी सोयायटीने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे दाद मागितली आहे.

ठळक मुद्देकळव्यातील घटनासोसायटीतील रहिवाशांनी केली पोलीस उपायुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील एका कोरोनाग्रस्ताच्या कुटूंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तरीही या कुटूंबियांपैकी एकजण घराबाहेर फिरत असतांना त्याला या सोसायटीतील सदस्याने हटकल्यानंतर त्यांच्यावरच त्याने दगडफेक करीत शिवीगाळ केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी या सोयायटीने पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे तक्रार केली आहे.कळव्यातील राणा टॉवरजवळील या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील एका व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याला सफायर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या कुटूबातील पाच जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तरीही त्याचा मुलगा गुरुवारी या सोसायटीच्या बाहेर बिनधास्तपणे फिरत होता. त्याला सोसायटीतील रहिवाशांनी तसेच काही महिलांनी अटकाव केल्यानंतर त्यांनाच त्याने शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच पहिल्या मजल्यावर पेव्हर ब्लॉकची वीटही फेकून मारल्याने या भागात १८ जून रोजी दुपारी ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास तणावाचे वातावरण झाले होते. त्याची तक्रार सोसायटीतील महिलांनी कळवा पोलीस ठाण्यात केली. त्यावर पोलिसांनीही या कुटूंबाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांसमोरच या कुटूंबातील एकाने अश्लील शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप सोसायटीतील महिलांनी केला आहे. याप्रकरणी सोसायटीतील कदम, पगारे, देवेंद्रम आणि काटे आदी कुटूंबीयांनी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्याकडे शुक्रवारी मेलद्वारे तक्रार केली आहे.विशेष म्हणजे गेल्या महिन्यात याच कुटूंबातील कोरोनाग्रस्ताला येथील परिचारिकेने जुगार खेळण्याला अटकाव केला होता. त्यावेळी तिला आणि तिच्या पतीलाही त्याने मारहाण करीत धमकी दिली होती. आता पुन्हा हा दगडफेकीचा प्रकार घडल्याने या भागात तणावाचे वातावरण आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारी