CoronaVirus News: कोरोनामुळे रखडला अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:59 IST2020-08-13T00:59:50+5:302020-08-13T00:59:57+5:30
कार्यव्यस्ततेचा परिणाम; पेन्शनची रक्कमही १० दिवस उशिरा प्राप्त

CoronaVirus News: कोरोनामुळे रखडला अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा पगार
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेला बँकेत जमा न झाल्याने कर्मचाºयांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. तब्बल बारा दिवस उलटले तरी पगार न झाल्याने कर्मचाºयांनी पालिका प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने कर्मचाºयांचे पगार देण्याची प्रक्रिया सुरु केली.
अंबरनाथ पालिकेतील आस्थापना विभागातील कर्मचाºयांना कोरोनाची ड्युटी लावण्यात आल्याने त्या कर्मचाºयांना आपली कार्यालयीन कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे पगाराची प्रक्रिया लांबली. पालिका कर्मचाºयांचा पगार एक आॅगस्टला होणे अपेक्षित होते. मात्र त्यासंदर्भातील कोणतीच कार्यवाही न झाल्याने अकाउंटस डिपार्टमेंटला पगार जमा करण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या. तब्बल बारा दिवस उलटले तरी कर्मचाºयांचा पगार जमा न झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कोरोनासारख्या भयानक आजाराशी जीवावर उदार होऊन कर्मचारी लढत असताना त्यांची आर्थिक कोंडी होणार नाही, याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होते. वेळेवर पगार न झाल्याने अनेक कर्मचाºयांचे आर्थिक गणित
बिघडले आहे.
लवकरच करणार सर्वांचा पगार
सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या खात्यात पेन्शनही वेळेवर जमा झाली नसल्याने या कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली. तब्बल १० दिवसांनंतर त्यांची पेन्शन जमा झाल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. दुसरीकडे कर्मचाºयांच्या पगाराबाबत स्पष्टीकरण देताना पालिकेतील बहुसंख्याक कर्मचारी हे कोरोनाच्या ड्युटीवर असल्याने पगारास विलंब झाल्याचे प्रशासनाने मान्य केले. सर्व कर्मचाºयांचा पगार लागलीच जमा केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.