शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : शिवसेना-भाजपच्या अपयशाची शिक्षा लोकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:15 IST

या शहरातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले असते तर लॉकडाऊनच्या आड लपण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही शहरांतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

प्रशांत माने कल्याण : कल्याण-डोंबिवली या शहरांतील १७ लाखांच्या लोकसंख्येकरिता गेल्या २० वर्षांत पाच ते दहा हजार बेडचे सुसज्ज इस्पितळ उभारण्यात अपयशी ठरलेले सर्वपक्षीय नेते कोरोना वाढत असल्याचे निमित्त करुन लॉकडाऊनची भाषा करीत असून आयुक्तांच्या गळ््यात निर्णयाचे घोंगडे अडकवत आहेत. या शहरातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम करण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आले असते तर लॉकडाऊनच्या आड लपण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही शहरांतील नागरिक व्यक्त करीत आहेत.कोरोनाच्या महामारीत परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत असताना केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रूग्णांना बेडही मिळू नये ही शरमेची बाब आहे. एकीकडे खाजगी रूग्णालयांकडून लूट सुरू असताना दुसरीकडे महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेणाऱ्या रूग्णांचे उपचाराअभावी बळी जात आहेत. महापालिकेत २० वर्षांहून अधिक काळ सत्ता उपभोगणाºया शिवसेना आणि भाजप बरोबरच विरोधी पक्षांचेही हे अपयश आहे. गेल्या काही वर्षात कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील १७ लाख लोकसंख्येसाठी एखादे मोठे सरकारी रूग्णालय ते उभारु शकले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची भाषा करून आयुक्तांवर दबाव आणत आहेत. लॉकडाऊन हा पर्याय नाही. केवळ पुढील महापालिका निवडणुका डोळ््यासमोर ठेवून आपले अपयश झाकण्यासाठीच लॉकडाऊनची मागणी करून अपयशाचे खापर प्रशासनावर फोडण्याची खेळी लोकप्रतिनिधींनी खेळली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.केडीएमसीची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर अशी दोन मोठी रूग्णालये तर १३ आरोग्य केंद्रासह चार छोटी रूग्णालये आहेत. सद्यस्थितीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रीनगर रूग्णालय कोविड रूग्णालय म्हणून चालविले जात आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरु आहेत. आधीच आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असताना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी बहुतांश कर्मचारी वर्ग दिला आहे. त्यामुळे रुक्मिणीबाई रूग्णालयावर ताण पडला आहे. आजच्याघडीला शास्त्रीनगर रूग्णालयात बेडची संख्या ६२ आहे तर रुक्मिणीबाई रुग्णालयात १२० बेड असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. व्हेंटिलेटर सुविधा असल्याचे सांगितले जात असले तरी शास्त्रीनगर रूग्णालयात अतिदक्षता विभागाची सुविधा नाही.लॉकडाऊनचा निर्णय आयुक्तांच्या गळ््यात घालून लोकप्रतिनिधी मोकळे झाले आहेत. आयुक्तांना आपल्या सेवापुस्तिकेत लाल शेरा नको असल्याने ते लोकप्रतिनिधींची मागणी अमलात आणून मोकळे होतील. मात्र त्याची शिक्षा ही सर्वसामान्यांना मिळणार आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत. खासदारांनी वेळोवेळी रूग्णालयांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ती सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या सूचना अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिल्या आहेत. परंतु या सर्व अपयशाची शिक्षा लॉकडाऊन करुन नागरिकांना का देणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.>आनंदीबाई जोशींचावारसा कसला सांगता?कल्याणमधील आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. त्याचा सार्थ अभिमान असल्याचे आपण सांगतो. पण, त्यांच्याच शहरात महापालिकेचे एखादे मोठे सुसज्ज रूग्णालय नाही, ही सत्ताधाºयांबरोबरच विरोधी पक्षांसाठीही लाजिरवाणी बाब आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस