शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

CoronaVirus News: प्रवाशांमुळे कोरोना पसरण्याचा धोका?; अ‍ॅण्टीजेन चाचणीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:17 AM

स्थानकात स्टॉल लावण्यास आडकाठी

- मुरलीधर भवारकल्याण : मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असलेले कल्याण जंक्शन व त्यासमोरील एसटी डेपोच्या परिसरात अ‍ॅण्टीजेन चाचणी होत नाही. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून आलेले प्रवासी या स्थानकात उतरल्यानंतर थेट बाहेर पडून रिक्षा, टॅक्सी, मोटार व बसने कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर, टिटवाळा आदी परिसरांत असल्याने त्यांच्याद्वारे कोरोना पसरण्याचा धोका कायम आहे.लॉकडाऊनमध्ये आपापल्या गावी गेलेले मजूर पुन्हा मुंबईत परतू लागले आहेत. त्यांच्याबरोबर अन्य प्रवासीही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून येत आहेत. या प्रवाशांपैकी कोणी कोरोनाबाधित आहे का, हे तपासण्यासाठी ठाण्याच्या धर्तीवर कल्याण स्थानकात त्यांची अ‍ॅण्टीजेन चाचणी झाली पाहिजे. सर्व आरोग्य केंद्रांत ही चाचणी करणाऱ्या केडीएमसीने स्थानकात तशी सुविधा सुरू केलेली नाही. केडीएमसीने क्रेष्णा डायग्नोस्टीक या संस्थेला कल्याण स्थानकात अ‍ॅण्टीजेन चाचणीचा स्टॉल लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, स्थानक परिसरात काही जण हा स्टॉल टिकू देत नाहीत. त्यामुळे तो लावलेला नसल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.कल्याण एसटी डेपोत पनवेल, नवी मुंबई, मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे आदी भागांत काही प्रमाणात बस सोडल्या जात आहेत. तसेच अन्य ठिकाणांहून बस या डेपोत येतात. खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसही मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीत येतात. या बसमधून येणाºया प्रवाशांचीही अ‍ॅण्टीजेन चाचणी झाली पाहिजे. मात्र, तेथेही चाचणीसाठी कोणतीही सुविधा मनपाने सुरू केलेली नाही. डेपो व्यवस्थापनाकडूनही मनपाकडे अशा प्रकारची मागणी केलेली नाही. त्यामुळे बसमधील प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे....तर तत्काळ उपचार शक्यकेडीएमसी सध्या ‘फॅमिली डॉक्टर कोविड फायटर’, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून कोरोना रुग्णांचा शोध घेत आहे. त्याचप्रमाणे कल्याणबरोबर अन्य स्थानके, बस डेपो येथेही अ‍ॅण्टीजेन चाचणी केली पाहिजे, जेणेकरून बाहेरून येणाºया कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होईल. तसेच त्यांच्यामुळेहोणारा प्रसार थांबेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या