शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

CoronaVirus News : ठाण्यात 800 हून अधिक मृत्यू कोरोनामुळे, किरीट सोमय्या यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:17 IST

CoronaVirus News : शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोप किरीट सोमय्या केला. ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाणे  : कोरोनामुळे (कोविड-19) मृत्यूचे प्रमाण मोठ्या गतीने वाढत आहे. कब्रस्थानमधील जागा देखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकाराने कब्रस्थानसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार अन्य जी काही ठिकाणे असतील त्याठिकाणी जागा वाढविली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. 

ठाकरे सरकार कोरोनाचे मृत्यू लपवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर मुंब्य्रात लॉकडाऊनच्या कालावधीत 953 मृत्यू झाले असून त्यातील 400 हून अधिक मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचा धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. तर ठाण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 800 हून अधिक मृत्यू झाले असून ही माहिती लपवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शुक्रवारी सोमय्या यांनी मुंब्य्रातील कब्रस्थानची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे , गटनेते संजय वाघुले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. येथील एका कब्रस्थानमध्येच आतापर्यंत 142 मृतदेह दफन करण्यात आले आहेत. परंतु पालिका प्रशासन म्हणते कोरोनामुळे केवळ 277 मृत्यू झाले आहेत. परंतु ही आकडय़ांची लपवा लपवी कशासाठी केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

केवळ ठाकरे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबईत ज्या प्रकारे सुरवातीला 2200 मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात तेथे 4400 मृत्यू झाल्याचे आता मान्य केले जात आहे. तीच परिस्थिती ठाण्यात देखील असून मृत्यूची संख्या लपविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आकडे लपवित असल्याने नागरीक बाहेर पडत असून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्य्रातील मंत्री गप्प : निरंजन डावखरेकोरोनाच्या संसर्गाने वाढत्या मृत्युमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमीपैंकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही. त्यानंतर दफनविधी कुठे करायचे हा प्रश्न आहे. मात्र, या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री महोदय गप्प का आहेत, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केली. या प्रश्नावर राज्य सरकार व महापालिकेवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. मुंब्रावासियांसाठी तत्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी डावखरे यांनी केली.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस