शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

CoronaVirus News in Kalyan Dombivali : फाइल हरवल्याने आजीबाई २७ दिवस रुग्णालयात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:47 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाच्या चाचणीत आजीसह त्यांची ३५ वर्षीय सून आणि सात वर्षीय नात या तिघींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला तिघींनाही मुंबईतील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

- प्रशांत मानेडोंबिवली : पूर्वेत राहणाऱ्या ७४ वर्षीय आजींना कोरोना झाल्याने मुंबईतील एका सरकारी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. अकरा दिवसांचे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी नेण्याकरिता डोंबिवलीतून रुग्णवाहिका आली होती. मात्र, त्यांची वैद्यकीय फाइलच मधल्या काळात गहाळ झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम थोडाथोडका नव्हे तब्बल २७ दिवस लांबला. यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.कोरोनाच्या चाचणीत आजीसह त्यांची ३५ वर्षीय सून आणि सात वर्षीय नात या तिघींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला तिघींनाही मुंबईतील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आजींना वृद्धांसाठी राखीव असलेल्या विभागात ठेवण्यात आले, तर सून आणि नातीला एकाचा कक्षात ठेवण्यात आले. पाच दिवसांनंतर सून आणि नातीला लीलावती रुग्णालयाच्या परिसरातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. आजींची प्रकृती व्यवस्थित होती. पाच ते सहा वेळा टेस्टिंंगसाठी स्वॅब घेण्यात आले. अकराव्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज दिला जातोय, असे सांगण्यात आले. मात्र, अचानक माझ्या रिपोर्टबाबत काही शंका आल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे घरी घेऊन जाण्यासाठी बोलावण्यात आलेली केडीएमसीची रुग्णवाहिका ऐनवेळी रद्द केली. दुसºया दिवशी पुन्हा स्वॅब घेण्यात आला. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याचदिवशी आजींची रिपोर्ट फाइल डॉक्टरांकडे गेली असती तर त्यांना डिस्चार्ज मिळाला असता. परंतु, तसे झाले नाही. आजींना डिस्चार्ज दिला नसतानाही तेथील रजिस्टरमध्ये डिस्चार्ज दिल्याची नोंद केली गेली. केडीएमसीलाही आजीचा डिस्चार्ज झाल्याचे कळवण्यात आले. आपला रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही घरी का सोडत नाही, या शंकेमुळे आजींनी फाइल दाखवण्याचा आग्रह केला. मात्र, आजींना ना फाइल दाखवण्यात आली ना डिस्चार्ज दिला गेला. फाइल सापडत नसल्याचे कारण आजींना दिले जात होते. २७ दिवस इस्पितळात काढल्यावर आजींनी डीनकडे तक्रार करण्याची धमकी दिल्यावर तत्काळ सूत्रे हलली आणि गहाळ झालेली फाइल सापडली.- डोंबिवली पूर्वेतील या वृद्ध महिलेची नात आणि सुनेच्या रिपोर्टमध्येही घोळ आल्याने त्यांनाही नाहक मनस्ताप सोसावा लागला. त्यामुळे त्यांचाही प्रवास आजींप्रमाणे लांबला. रक्तदाबाचा त्रास असलेल्या आजींनी कसेबसे घर गाठल्यानंतर हा प्रवास स्वत: कथन केला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रूग्णालय प्रशासनावरील ताण वाढल्याने हा प्रकार घडला असेल, असे त्या म्हणतात.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस