शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: हॉस्पिटलसाठी पैसे जमा करणार जितो आणि एमसीएचआय; जबाबदारीसाठी मात्र महापालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 14:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रुग्णालय चालविण्याचा अनुभव विचारात घेऊन ग्लोबल हब येथील एक हजार २४ खाटांचे रुग्णालय उभारण्याचे ...

ठळक मुद्दे हॉस्पिटलमध्ये जीतो ट्रस्ट- एमसीएचआयची नक्की जबाबदारी कोणती? पालिकेने खुलासा करण्याची भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रुग्णालय चालविण्याचा अनुभव विचारात घेऊन ग्लोबल हब येथील एक हजार २४ खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम जितो मेडिकल ट्रस्ट आणि एमसीएचआयला पालिकेने दिले. त्यासाठी त्यांनी बिल्डरांकडून निधीही जमविला. मात्र, आता मृतदेह अदलाबदलीसह रु ग्णालयातील गलथान कारभाराच्या गोंधळात जितो ट्रस्ट आणि एमसीएचआय नामानिराळे झाले. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये जीतो ट्रस्टसह एमसीएचआयची नक्की जबाबदारी कोणती? याचा खुलासा महापालिका प्रशासनाने करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्राद्वारे केला आहेकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने एक हजार बेडचे रु ग्णालय उभारण्याची घोषणा केली होती. त्यावेळी जितो ट्रस्ट आणि एमसीएचआयकडे सर्व जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांना तत्कालीन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी बिल्डरांकडून सीईआरचा निधी जमविण्याची परवानगीही दिली. त्यानुसार हॉस्पिटल उभारले गेले. मात्र, उद्घाटनाच्या दिवसापासूनच आजतागायत हॉस्पिटलचा कारभारामध्ये सुसुत्रता नाही. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाचरु ग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराची लक्तरेही भाजपने मांडली. याच पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयात जितो आणि एमसीएचआयची नक्की भूमिका काय, हा प्रश्न उपस्थित होतो.यारु ग्णालयाच्या भोंगळ कारभाराविषयी महापालिका प्रशासनावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, त्यापासून जितो ट्रस्ट आणि एमसीएचआय नामानिराळा आहे. त्यांची भूमिका केवळ पैसे उभारण्याची होती का? केवळ इन्फ्रास्ट्रक्चर उभारून त्यांनी जबाबदारी झटकली आहे का, याचा खुलासा करावा, अशी मागणी पवार यांनी केली.यापूर्वी ठाणे महापालिकेने हाजूरी येथील संपूर्ण इमारत जितो ट्रस्ट रु ग्णालयाला दिलेली आहे. संबंधित १२० खाटांचे रु ग्णालय कोरोनासाठी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडेही महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. जितो ट्रस्टवर एवढी मेहरबानी कशासाठी केली जात आहे? असा सवालही पवार यांनी केला आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस