शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: ‘ठाण्यातील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची वाढवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:28 IST

ठाण्यातील स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असतांनाच आता या ठिकाणच्या धूराचा सामनाही स्थानिक रहिवाशांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जवाहरबाग स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देमनसेचे ठाण्याच्या महापौरांना साकडेशहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सध्या ठाण्यात कोवीड तसेच अन्य कारणाने मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहांवर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या चिमणीची उंची कमी असून ती वाढविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.मोरे यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील जवाहरबाग या गजबजलेल्या मार्केट परिसरामध्ये हिंदू धर्माची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचा धूर बाहेर फेकणा-या चिमणीची उंची हा फार कमी आहे. त्यामुळे त्यातून निघालेला धूर, धूळ आणि राख आदी घटक हे आजूबाजूला असलेल्या रस्त्यावर तसेच घरांमध्ये हवेमार्फत उडून भोवतालच्या परिसरात पसरत आहेत. ठाण्यात कोवीडसह अन्यही कारणाने मृत्यु पावलेल्या व्यक्तिींवर याच स्मशानभूमीत दररोज मोठया प्रमाणात अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे सभोवताली धूळ आणि धूराचेही साम्राज्य पसरते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांना या धूराचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांची दारे, खिडक्या नेहमीच बंद ठेवाव्या लागतात. कोवीड बाधित मृतांच्या वाढत्या संख्येमुळे तर अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीच्या समोरील रस्त्यावर रूग्णवाहिका एकामागून एक रांगेत उभ्या असल्याचे चित्र स्थानिकांना रोज पहायला मिळते. या धुरामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तात्काळ या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या विद्युत दाहिनीच्या धूर बाहेर फेकणाºया मार्गाची (चिमणी) उंची वाढवावी, अशी मागणी मनसेचे मोरे यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसे