शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अंबरनाथच्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा परिसरात मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 13:22 IST

अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसांगणिक वाढत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये  गुरुवारी एकाच दिवशी 73 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्याने त्यांना नेमके ठेवायचे कुठे हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर होता. त्यातील बहुसंख्य रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र चिंचपाडा भागातील दोन कोरोनाग्रस्त रुग्ण हे शुक्रवारी सकाळी परिसरामध्ये मुक्त संचार करीत असताना दिसले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोन्ही रुग्णांना तात्काळ पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. 

अंबरनाथ शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसांगणिक वाढत आहे. त्यातच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात येणारे रुग्णालय अद्यापही पूर्ण न झाल्याने वाढणाऱ्या रुग्णांना नेमकं ठेवावं कुठे हा प्रश्न पालिका प्रशासनाकडे पडला आहे. त्यातच गुरुवारी तब्बल 73 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते.

पालिका प्रशासनाने काही रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये हालविले तर ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आढळत होते त्या रुग्णांना सिटी कोविड केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले, तर उर्वरित काही रुग्णांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात  आले. मात्र शुक्रवारी सकाळी चिंचपाडा भागातील दोन कोरोनाग्रस्त रुग्ण हे परिसरामध्ये फिरताना दिसत होते. या रुग्णांना घरातच क्वारंटाईन केलेले असतानादेखील ते घरात राहत नसल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. चिंचपाडा भागातील हे दोन्ही रुग्ण बाहेर फिरत असल्याने समूह संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे दोन्ही रुग्ण स्वतःची काळजी न घेता घराबाहेर पडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसambernathअंबरनाथthaneठाणे