शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: महिला पोलीस उपनिरीक्षकाने प्लाझ्मा दान केल्याने कोरोनाबाधित वृद्धेला जीवदान

By जितेंद्र कालेकर | Updated: October 6, 2020 02:21 IST

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांनी शनिवारी एका ७५ वर्षीय वृद्धेला आपला प्लाझ्मा दान करुन पोलीस आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कोणाला तरी जीवदान मिळत असेल तर नक्कीच प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी, अशी प्रतिक्रीया लंबाते यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे कोरोना योद्धा उपनिरीक्षकाचे कौतुक प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनावर मात केल्यानंतर कोपरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांनी शनिवारी एका ७५ वर्षीय वृद्धेला आपला प्लाझ्मा दान करुन पोलीस आणि तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे कोरोना योद्धा लंबाते यांचे पोलीस वर्तुळात कौतुक होत आहे.ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस कर्मचारी यांची आई भामाबाई अवघडे यांच्यावर घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांना पॉझिटिव्ह या प्लाझ्माची गरज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. या नातेवाईकांनी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी सचिन रावराणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कोपरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक लंबाते यांच्याकडे प्लाझ्माबाबत विचारणा केली. लंबाते यांनी लागलीच प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर ठाण्यातील नौपाडा येथील ब्लडलाईन या ब्लड बँकेत जाऊन त्यांनी प्लाझ्मा दान केले. त्यांचा प्लाझ्मा वेदांत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भामाबाई (७५) यांना देण्यात आला. लंबाते यांनी वेळीच प्लाझ्मा दिल्यामुळे भामाबाई यांच्यावरील उपचारांसाठी चांगली मदत झाली. त्यामुळे अवघडे कुटुंबीयांनी उपनिरीक्षक दीपाली लंबाते यांचे तसेच त्यासाठी प्रयत्न करणारे रावराणे यांचेही आभार मानले आहेत. 

‘‘ कोरोनावर मात केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. याआधीही मला पोलीस आयुक्तांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी विचारणा केली होती. गैरसमजामुळे प्लाझ्माचे दान कोणी करीत नाही. प्लाझ्मा दान केल्याने कोणाला तरी जीवदान मिळत असेल तर नक्कीच प्लाझ्मा दानाचीही जनजागृती व्हायला हवी.’’दीपाली लंबाते, पोलीस उपनिरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका