शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात मृतांचा आकडा नऊशे पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 04:43 IST

ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली. दिवसभरात १३३२ बाधितांसह ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २७ हजार ४७९ तर मृतांचा आकडा नऊशे (९११) पार झाला आहे. शुक्रवारी ठाण्यात तब्बल ३६५ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल कल्याणमध्ये ३५८ रुग्ण आढळले. यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीत बाधितांची संख्या सात हजार ४५६ वर गेली असून ४ जणांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या २६८ झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ३५८ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या चार हजार ८७३ तर मृतांची ९६ इतकी झाली आहे. नवी मुंबई महापालिकेत २२४ रु ग्णांची तर पाचजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ८५३ तर मृतांची १९४ वर पोहोचली आहे. यापाठोपाठ भिवंडी महापालिका क्षेत्रात ९२ बाधीतांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार ५८८ तर मृतांची ९४ वर पोहोचली. मीरा-भार्इंदरमध्ये १२० रूग्णांसह पाच मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८५५ तर मृतांची १२९ झाली. उल्हासनगरात ६२ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४६८ तर दिवसभरात तीन जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३९ झाली आहे. अंबरनाथमध्ये १९ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या एक हजार ४९६ तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या ३७ झाली आहे. बदलापूरमध्ये ११ रु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे बाधितांची संख्या ६६० तर मृतांची १५ झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ८१ रुग्णांसह तीन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार २३० तर मृतांची ३९ वर गेली आहे.>वसई-विरारमध्ये दिवसभरात ३५८ नवीन रुग्णवसई-विरार शहरात शुक्रवारी दिवसभरात सर्वाधिक ३५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. त्याच वेळी उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पालिका हद्दीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०४ झाली असून ११८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. आता पालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारवर पोहचली आहे.वसई-विरारमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३५८ रुग्ण आढळून आल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. आतापर्यंत दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यात पुरुष २०४ तर १५४ महिला रुग्णांचा समावेश आहे.

नवी मुंबईत २२४ रूग्ण वाढलेशहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात २२४ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ५८५३ झाली आहे. नवी मुंबईत पाच दिवसात एक हजार रूग्ण वाढले आहेत. प्रतिदिन दोनशेपेक्षा जास्त रूग्ण वाढत आहेत. कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, घणसोली, ऐरोली परिसरात झपाट्याने रूग्ण वाढत आहेत. शुक्रवारी बेलापूरमध्ये २८, नेरूळमध्ये ३८, वाशीत १९, तुर्भेमध्ये १२, कोपरखैरणेमध्ये ३०, घणसोलीत २७, ऐरोलीत ५४ व दिघामध्ये १६ रूग्ण वाढले. शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १९४ झाली आहे. तर १० ६जण बरे होवून घरी परतल्याने एकूण ३२०४ जण कोरोनामुक्त झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस