शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

CoronaVirus News : मुंबईच्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा कोरोनावरील उपचार खर्च साडेपाच लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 01:02 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मुंबईतील एका माजी सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात एकूण आठ जण कोरोनाबाधित निघाले. या अधिकाºयाचा मुलगा आणि सून दोघेही पोलीस खात्यात शिपाई आहेत.

ठाणे : दोन दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या मुंबईतील माजी सहायक पोलीस उपनिरीक्षकास ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलने अव्वाच्या सव्वा बिल लावल्याचा आरोप करत, त्यांच्या नातेवाईकांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेने वेदांत हॉस्पिटलला याबाबत जाब विचारला; मात्र हा खर्च देण्याची तयारी मुंबई पोलीस दलाने दर्शवली असून, तसा ईमेलही पाठवल्याने आपण बिलाचे पैसे मागितले नसल्याचे स्पष्टीकरण हॉस्पिटलने रविवारी दिले.मुंबईतील एका माजी सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात एकूण आठ जण कोरोनाबाधित निघाले. या अधिकाºयाचा मुलगा आणि सून दोघेही पोलीस खात्यात शिपाई आहेत. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. माजी पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला ठाण्यातील घोडबंदर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १५ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या पत्नीचे बील तीन लाखांच्या घरात आणि त्यांचे बिल साडेपाच लाख रुपये झाले. त्यांच्या मुलांनी तीन लाख भरले. मात्र त्यांनतरही साडेपाच लाखांचे बिल हातात आले. त्यामुळे त्यांनी रविवारी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या पदाधिकाºयांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला जाब विचारुन बिल माफ करण्याची मागणी केली. याबाबत हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्रार खान यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत गैरसमज पसरविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मृत पोलीस अधिकाºयाचे नातेवाईक म्हणाले की, हॉस्पिटलने अव्वाच्या सव्वा बिल लावले. ते आम्हाला परवडणारे नव्हते. म्हणूनच आम्ही मनसे पदाधिकाºयांकडे तक्रार केली होती.मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस अधिकारी १६ दिवस आयसीयुमध्ये व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे इतके बिल येणारच. त्यांचे साडेपाच लाख रुपये बिल झाले होते. त्यातील ५0 हजार रुपये नातेवाईकांनी जमा केले. त्यांना एक लाखाची सूट देऊन चार लाख भरायचे होते. त्यांच्या नातेवाईकांना बिल दाखवले होते. त्याचवेळी मुंबई पोलिसांकडून १५ मे रोजी आम्हाला ईमेल मिळाला. त्यात संपूर्ण बिल मुंबई पोलीस भरेल, त्यांच्याकडे मागू नका, असे म्हटले होते. त्यामुळे आम्ही पैसे मागितले नाही.- डॉ. अब्रार खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, वेदांत हॉस्पिटल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईthaneठाणे