शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: कोरोनामुळे ठाण्यातील कुटूंबावर दुहेरी संकट: कॉरंटाईन झाल्याचा फायदा घेत घरातून लांबविला लाखोंचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:34 IST

कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतरांनाही कॉरंटाईन करण्यात आले. याचाच फायदा घेत नौपाडयातील एका घराचे कुलूप तोडून चोरटयांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे

ठळक मुद्देनौपाडयातील घटनाअज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कुटूंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतरांनाही कॉरंटाईन करण्यात आले. याचाच फायदा घेत नौपाडयातील एका घराचे कुलूप तोडून चोरटयांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदनवाडी रायगड गल्ली भागातील एका कुटूंबातील महिलेला ३ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेने या परिवारातील इतरांना देखील हाजूरी येथील विलगीकरण केंद्रामध्ये कॉरंटाईन केले होते. त्यामुळे या कुटूंबियांचे घर ३ ते १५ जुलै या काळात बंदच होते. दरम्यानच्याच काळात दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरकाव करुन चोरटयांनी काही रोकड, सोन्या आणि चांदीचे दागिने असा घरातील एक लाख ८९ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कुटूंबियांनी १५ जुलै रोजी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.* ठाण्यात सध्या कोरोनामुळे अनेक घरांमध्ये घरातील एक सदस्य जर रुग्णालयात दाखल असेल तर अन्य कुटूंबियांना कॉरंटाईन केले जाते. ज्यांना घरात कॉरंटाईन केले असेल, तिथे चोरीची समस्या उद्धभवत नाही. पण, ज्यांना केंद्रामध्ये कॉरंटाईन केले, त्याठिकाणी जर अशा चोरीच्या घटना घडत असतील तर नागरिकांनी कशाच्या आधारावर कॉरंटाईन सेंटरमध्ये जायचे, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज ठाणे परिसरातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtheftचोरी