शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

CoronaVirus News : घराबाहेर जाणाऱ्या तरुणांमुळे मुले, ज्येष्ठांना होतेय कोरोनाबाधा! जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 23:51 IST

CoronaVirus News: पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे.

- हितेन नाईक

पालघर : कोरोनाच्या लाटेत घरातील तरुण मंडळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडत असल्याने त्यांच्यासोबत येणाऱ्या कोरोना विषाणूच्या संपर्कामुळे घरातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक बाधित ठरण्याचे प्रमाण वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, ५ ते ३० वयोगटातील ३ हजार ४३० छोटी मुले-तरुण, २ हजार ६१५ छोट्या मुली-तरुणी तर ज्येष्ठ २ हजार ४५७ पुरुष व १ हजार ५०२ महिला कोरोनाच्या विळख्यात अडकून पडल्याने उदरनिर्वाह आणि जीवघेण्या आजाराच्या कैचीत सापडलेल्या कुटुंब प्रमुखांची मानसिकता अडचणीत सापडली आहे.पालघर जिल्ह्यात मार्च २०२० ते २४ मार्चदरम्यान १० वर्षाखालील ४५२ लहान मुले तर ४०० मुली असे एकूण ८५२ लहान बालकांना कोरोनाची लागण झाली असून १० ते २० वयोगटातील ९७८ मुले तर ७१५ मुली असा एकूण १ हजार ६९३ मुलांना लागण झाली आहे. २१ ते ३० वयोगटातील २ हजार तरुण तर १५०० तरुणी असे एकूण ३ हजार ५००, ३१ ते ४० वयोगटातील २ हजार २०० तरुण तर १ हजार ३५७ तरुणी असा एकूण ३ हजार ५५७ तरुण, ४१ ते ५० वयोगटातील १ हजार ७९९ रुण तर १ हजार १०० असा २ हजार ८९९ तरुण तर ५१ ते ६० वयोगटातील व्यक्तींपैकी १ हजार ४६० ज्येष्ठ पुरुष व्यक्ती तर ८३६ महिला असे एकूण २ हजार २९६, तर ६० ते ७० वयोगटातील ६७९ पुरुष तर ४६० महिला असे एकूण १ हजार १३९ रुग्ण, ७१ ते ८० वयोगटातील २६० पुरुष तर १६५ महिला असे एकूण ४२५ रुग्ण तर ८० वर्षावरील ५८ ज्येष्ठ पुरुष तर ४१ महिला असे एकूण ९९ ज्येष्ठ कोरोनाने बाधित झाले असल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो.५ वर्ष ते २२ वयोगटातील लहान मुले, तरुण शाळा कॉलेज बंद असल्याने घरात बसून ऑनलाइन अभ्यास करीत आहेत, तर दुसरीकडे ५८ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकही सेवानिवृत्ती आणि विविध आजारांनी त्रस्त असल्याने घरातच बसून असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी वरील दोन्ही वयोगटातील ६ ते ७ हजार व्यक्तींना कोरोनाने ग्रासल्याचे दिसून येत आहे.

बाहेरून घरात आल्यावर अशी घ्या काळजी- नोकरी-रोजगार आदींसह काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनी मास्कचा वापर करावा. तसेच कामावरून घरी आल्यावर घरात शिरताना सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ आंघोळ करावी. - घरातील इतर सदस्यांना भेटताना, बोलताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे. कोरोनासदृश लक्षणे वाटल्यास घरातील खोलीत स्वतःला कोंडून घेत उपचार घ्यावेत.- अंगातले कपडे गरम पाण्यात बुडवून धुण्यास ठेवावे. तसेच वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करून स्वत:ला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याची दक्षता घ्यावी. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpalgharपालघर