शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीतील कोरोना उपाययोजनांची केंद्रीय पथकाने केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:48 IST

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सरकारी पातळीवर केल्या जात आहे.

कल्याण: कोरोनाचे रुग्णांची संख्या जास्त असल्याने ठाणो जिल्हा रेडझोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठाणे जिल्ह्यातील कल्याणडोंबिवली महापालिका कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने कोरोना रोखण्यासाठी महापालिकेकडूून केल्या जाणाऱ्या उपाययोजनाची केंद्रीय पथकाने दोन दिवस पाहणी केली. या ठिकाणी कोरोना टेस्टींग लॅब नसल्याचा महत्वाचा निष्कर्ष या पथकाने नमूद केला आहे.

देशातील 20 जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतोय. या जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सरकारी पातळीवर केल्या जात आहे. या उपाययोजनाची पाहणी करुन त्याचा आढावा घेण्यासाठी 20 जिल्ह्यांकरीता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलयातर्फे पाहणी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी डॉ. दीपक पाल व केतकी शर्मा या दोन डॉक्टरांचे पथक ठाणो जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आहे. या पथकाने कल्याण डोंबिवली शहरातील कोरोनाची स्थितीची पाहणी काल मंगळवारी व आज बुधवारी केली. हे पथक जिल्ह्यात 15 दिवसाकरीता आहे.

कल्याण डोंबिवलीच्या पाहणी पश्चात उद्या हे पथक नवी मुंबईला रवाना होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील महापलिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे भेट दिली. त्याठिकाणी रुग्णांना महापलिकेकडून दिले जाणारे जेवण त्यांच्या सोयी सुविधांची माहिती घेतली. त्यापश्चात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर कोरोना रोखण्यासाठी आणखीन काय करता येईल याविषयीच्या काही महत्वाच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात प्रामुख्याने एक बाब पथकाच्या निदर्शनास आली आहे. कोरोना टेस्टींग लॅब ही मुंबईला आहे. त्यामुळे रिपोर्ट करीता मुंबईतील रुग्णालयाववर अवंलबून राहावे लागते. त्यामुळे रिपोर्ट येण्यास उशिर होतो. ही बाब पाहणी पथकाकडून केंद्र सरकारच्या निदर्शनास आणली जाणार आहे. याशिवाय पथकाने पोलिस उपायुक्तांची भेट घेतली. यावेळी शहरातील लॉकडाऊन अधिक कडक पद्धतीने पाळले जावे यावर भर द्यावा अशी सूचना केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCentral Governmentकेंद्र सरकारkalyanकल्याणdombivaliडोंबिवली