शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

CoronaVirus News : अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत, बदलापूरमध्ये तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 00:16 IST

CoronaVirus News: मानवतेचा दृष्टिकोन ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने तत्काळ २५० लिटर क्षमतेचा सिलिंडर पाठवत रुग्णांवर ओढवणारे संकट क्षमविले.

बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी ऑक्सिजनची गरज भासणार होती. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ ऑक्सिजन पुरविणे शक्य नसल्याने बदलापूर पालिकेने अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मानवतेचा दृष्टिकोन ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने तत्काळ २५० लिटर क्षमतेचा सिलिंडर पाठवत रुग्णांवर ओढवणारे संकट क्षमविले.कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गौरी हॉल येथे २५० बेडचे कोविड रुग्णालय उभारले असून हे सर्व बेड ऑक्सिजन बेड असून त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यासाठी पालिकेने एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून, त्या कंत्राटदारामार्फत लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. गौरी हॉलसोबतच पालिकेने आता जान्हवी हॉलमध्येही कोविड रुग्णालय उभारले असून, त्याठिकाणीही ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. त्या बेडसाठी गौरी हॉलमध्ये असलेले ऑक्सिजन जान्हवी लॉन येथे पाठविल्याने गौरी हॉलमधील रुग्णांना शुक्रवारी सकाळनंतर ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेऊन पालिकेने लागलीच कंत्राटदाराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले. मात्र अन्न व औषध प्रशासनामार्फत जे नवीन आदेश देण्यात आले आहे त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कंत्राटदाराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे बदलापूर पालिकेला किती ऑक्सिजनची गरज आहे हे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला कळविल्या शिवाय ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य नव्हते. त्यामुळे कंत्राटदाराची ही समस्या लक्षात घेत पालिकेने तत्काळ आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली. 

गौरी हॉलमधील रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सुरक्षेचा उपाय करीत अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातून २५० लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजनचा सिलिंडर मागविण्यात आला. अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात अतिरिक्त सिलिंडर असल्याने मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनीही मानवाचा दृष्टिकोन लक्षात घेत बदलापूर पालिकेला ही मदत केली.

कंत्राटदारामार्फत ऑक्सिजन येण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अंबरनाथ पालिकेकडून लिक्विड ऑक्सिजन मागविले होते. मात्र कंत्राटदाराकडून ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत झाला आहे.    - दीपक पुजारी, मुख्याधिकारी,     बदलापूर

टॅग्स :badlapurबदलापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस