शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

CoronaVirus News : भिवंडी ग्रामीणमध्ये रुग्णांची परवड, भरमसाट बिलांमुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 00:35 IST

ग्रामीणमधील रुग्णांना शासकीय रुग्णालयांत उपचार मिळत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयातील उपचारांसाठी ४० ते ५० हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नितीन पंडित भिवंडी : भिवंडीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात एकूण १४७१ हून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून यात ग्रामीण भागातील ४२६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीणमधील रुग्णांना शासकीय रुग्णालयांत उपचार मिळत नसल्यामुळे खाजगी रुग्णालयातील उपचारांसाठी ४० ते ५० हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.लॉकडाऊनमध्ये काम बंद असताना उपचारावर हजारोंचा खर्च करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच ज्या कोरोनाबाधित रुग्णांच्या परिवारातील नागरिकांनाही बाधा झाली तर त्या प्रत्येक व्यक्तीचे खासगी रुग्णालयाचे भरमसाट बिल कसे भरावे, असा प्रश्न सतावत आहे.भिवंडीत स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय घोषित झाले आहे. सध्या मनपाच्या कार्यकक्षेत हे रुग्णालय आहे. १०० बेडची रुग्ण व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात मनपाच्या भोंगळ कारभारामुळे सेवा सुविधांचा बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयात नागरिकांना योग्य व आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे आरोप होत आहेत.भिवंडीत आतापर्यंत ७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य मृत रुग्णांना या रुग्णालयाच्या गैरसोयीमुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. त्यातच कोविड रुग्णालय हे मनपाच्या अखत्यारीत असल्याने सध्या शहरातील रुग्णांनाच या रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. तसेच, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी या रुग्णालयात कोणतीच सोय नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या भागातील रुग्णांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.>उसनवारी, दागिने गहाणठेवून उपचारांचा खर्चभिवंडीतील ग्रामीण कोरोनाबाधित रुग्णांसाठी भिनार येथे ४०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यापैकी २०० बेड उपलब्ध झाले आहेत. मात्र, या सेंटरसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकार, नर्स व कर्मचारी उपलब्ध झाले नसल्याने हे कोविड सेंटर अजूनही सुरू झालेले नाही. सावद येथेही कोविड सेंटर मंजूर झाले असल्याची माहिती मिळत आहे. पण तेही सुरू झाली नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक रुग्ण उसनवारी व खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन, तर काही जण दागिने गहाण ठेवून रुग्णालयाचा बिल भरत असल्याची माहिती मिळत आहे.  >जेवणात डासभिवंडी : रांजनोलीनाका येथील टाटा आमंत्रणमधील क्वारंटाइन सेंटरमधील रु ग्णांना देण्यात येणारा नाश्ता आणि भोजनात डास आणि किडे सापडत असल्याच्या तक्र ारीरु ग्णांनी केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी रु ग्णांना नाश्त्यात दिलेल्या समोशामध्ये डास आढळल्याने संबंधित कॅन्टीन व्यवस्थापकावर कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दल अध्यक्ष अशोक जैन यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस