शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट; ९८३ नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 21:14 IST

CoronaVirus News : ठाणे शहरात दिवसभरात २४३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आता या शहरात ४३ हजार ८१४ रुग्ण संख्या झाली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरात आज ३३ नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची संख्या नऊ हजार ८९१ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२५ झाली आहे.

ठाणे : कोरोनाचे अवघे ९८३ रुग्ण सोमवारी दिवसभरात आढळले. या कमी रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख एक हजार ४५६ झाली आहे. आज ३० जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे शहरात दिवसभरात २४३ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. आता या शहरात ४३ हजार ८१४ रुग्ण संख्या झाली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरात आतापर्यंत एक हजार ११० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीला आज कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे येथे एकूण ९६३ मृतांची संख्या झाली आहे. नव्याने २१९ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या आता ४८ हजार १०७ वर गेली आहे.

उल्हासनगरात आज ३३ नवे रुग्ण सापडल्यामुळे रुग्णांची संख्या नऊ हजार ८९१ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३२५ झाली आहे. भिवंडीला पाच रुग्ण नव्याने आढळले असून एकही मृत्यू आज झाला नाही. या शहरात एकूण बाधीत सहा हजार ६७४ रुग्णांची, तर, ३२८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला १०६ रुग्ण सापडले  असून सहा मृत्यू झाले आहे. तर, बाधितांची संख्या आता २१ हजार ३९७ झाली असून मृतांची संख्या ६७७ पर्यंत गेली आहे. 

अंबरनाथमध्ये २५ रुग्ण आज आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.  आता बाधित सात हजार १९ रुग्ण असून २५९ मृत्यू आजपर्यंत झाले आहे. बदलापूरमध्ये ३२ रुग्ण नव्याने सापडले असून बाधीत रुग्ण सहा हजार ९८८ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृत्यूची संख्या ९३ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११५ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधीत रुग्ण १६ हजार १४९ झाले आहेत. तर मृत्यूची संख्या ४९० नोंदवण्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे