शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४८१ रुग्ण वाढले; सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 20:56 IST

CoronaVirus News in Thane : ठाणे परिसरात १०७ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ४२४  रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता एक हजार २३८ झाली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरात ३९ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात दहा हजार ८८१ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ४८१ रुग्ण मंगळवारी आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख २९ हजार ५०० रुग्ण झाले आहेत. तर, सात रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६९२ झाली आहे.   

ठाणे परिसरात १०७ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ४२४  रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता एक हजार २३८ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत १२० रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता येथे ५४ हजार १६०  बाधीत असून एक हजार ६१ मृतांची नोंद आहे. 

उल्हासनगरात ३९ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात दहा हजार ८८१ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे. भिवंडी शहरात १० बाधीत आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. आता या शहरात बाधीत सहा हजार २९०  झाले असून मृतांची संख्या ३४५ आहे. मीरा भाईंदरमध्येत ४२ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यूची नोंद आज केली. आता बााधीत २४ हजार २२२ झाले आहेत, तर, मृत्यू ७५७ नोंदले आहेत. 

अंबरनाथमध्ये १४ रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या सात हजार ८८३ झाली असून मृतांची संख्या २८९ आहे. बदलापूरमध्ये २२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या आट हजार ८६ झाली आहे. या शहरात मृत्यू नाही. त्यामुळे मृतांची संख्या ९८ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात १२ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता १८ हजार १८८ बाधितांची नोंद झालेली असून मृतांची संख्या ५६५ नोंदली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे