शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 1510 रुग्ण, तर 39 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 8:57 PM

CoronaVirus News: सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 413 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवी मुंबई महापालिकेत 164 रुग्णांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 957 तर, मृतांची संख्या 252 वर पोहोचला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोरोना बाधित रुग्णांनी पुन्हा एकदा उच्चांकी संख्या गाठली आहे. दिवसभरात 1510 बाधितांची तर, 39 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 43 हजार 926 तर मृतांची संख्या 1308 झाली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे. दिवसभरात कल्याणमध्ये तब्बल 413 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्या खोलाखाल ठाण्यात 268 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

सोमवारी कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 413 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या 9 हजार 499 तर, मृतांची संख्या 144 इतकी झाली आहे. ठाणे  महानगर पालिका हद्दीत 268 बाधितांची नोंद करण्यात आली असून त्यामुळे बाधितांची संख्या 10 हजार 999 वर गेली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 416 झाली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत 164 रुग्णांची तर, आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 7 हजार 957 तर, मृतांची संख्या 252 वर पोहोचला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात 88 बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 2 हजार 407 तर, मृतांची संख्या 120 वर पोहोचली. मीरा भाईंदरमध्ये 157 रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार तर मृतांची संख्या 166 इतकी झाली आहे. उल्हासनगर 159 रु ग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 969 तर तिघांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 57 झाली आहे. 

अंबरनाथमध्ये 56 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 252 तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 75 झाली आहे. बदलापूरमध्ये 38 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर बाधितांची संख्या 1 हजार 11 झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांची संख्या 17 झाली आहे. तर, ठाणो ग्रामीण भागात 167 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 361 तर मृतांची संख्या 61 वर गेली आहे.

आणखी बातम्या...

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"

चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे