CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४२२ नवे रुग्ण सापडले; ३८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 09:26 PM2020-10-10T21:26:29+5:302020-10-10T21:26:34+5:30

ठाणे शहरात ३९८ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४० हजार ४९२ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

CoronaVirus News: 1422 new corona patients found in Thane district; 38 killed | CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४२२ नवे रुग्ण सापडले; ३८ जणांचा मृत्यू

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४२२ नवे रुग्ण सापडले; ३८ जणांचा मृत्यू

googlenewsNext

ठाणे: जिल्ह्यात शनिवारीही एक हजार ४२२ रुग्ण नव्याने सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९० हजार ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज ३८ मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ८१६ झाली आहे. 
 
ठाणे शहरात ३९८ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४० हजार ४९२ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत एक हजार ६१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात ३३४ रुग्णांची वाढ झाली असून सहा मृत्यू आज झाले आहेत. या शहरात आतापर्यंत ४५ हजार ८७६ बाधीत झाले. तर, आजपर्यंत ८९५ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका परिसरात ३० बाधितांसह एकाच्या मृत्यू ची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ५९९ झाले आहे. तरी, आजपर्यंत ३१५ मृत्यू झाले आहेत. भिवंडीला आज ३३ बधीत आढळून आले असून  एकाचा ही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ३९३ असून मृतांची संख्या ३२२ आहे. मीरा भाईंदरमध्ये १३९ रुग्णांची तर, सहा मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या २० हजार २७६ झाली असून मृतांची संख्या ६२९ वर गेली आहे. 

अंबरनाथमध्ये ३६ रुग्णांची नव्याने वाढ. तर, आज एकाचा मृत्यू झाला आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ७२७ झाली आहे. तर, मृतांची संख्या २४१ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सहा हजार ६६६ झाली आहे. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ७७ ही मृत्यूची संख्या कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ११६ रुग्णांची वाढ झाली आणि दहा मृत्यू झाले आहेत. आता बाधीत १५ हजार ३३८ आणि मृत्यू ४६५ झाले आहेत.

Web Title: CoronaVirus News: 1422 new corona patients found in Thane district; 38 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.