CoronaVirus News: अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ‘केडीएमसी’त जास्त; सर्वाधिक मृत्यू ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:11 AM2020-08-12T00:11:33+5:302020-08-12T00:11:41+5:30

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे.

CoronaVirus More active patients in KDMC | CoronaVirus News: अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ‘केडीएमसी’त जास्त; सर्वाधिक मृत्यू ठाण्यात

CoronaVirus News: अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ‘केडीएमसी’त जास्त; सर्वाधिक मृत्यू ठाण्यात

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे या आजारावर यशस्वी मात करून स्वगृही परतणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना सध्या जिल्ह्यात कल्याण डोंबिवलीत उपचार घेणाºया रुग्णांची संख्या सर्वाधिक असून, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९९ हजार १५८ वर पोहोचली आहे. त्यापैकी केवळ १५ हजार ३२९ रुग्ण उपचारार्थ दाखल असून, यामध्ये सर्वाधिक कल्याण डोंबिवलीतील सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागण्यास सुरुवात झाली. त्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आजघडीला जिल्ह्यातील बाधितांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर आहे. असे असले तरी या आजारातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ९९ हजार १५८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था कोरोनाची लागण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. या उपाययोजनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ८१ हजार ५२ रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून स्वगृही परतले आहेत. तसेच भिवंडी, उल्हासनगर यासारख्या कोरोनाबाधित शहरांमधील रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असली तरी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत मात्र हा आकडा अजूनही म्हणावा त्या प्रमाणात कमी झालेला नाही.

रुग्ण कमी होईना
जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला मागे टाकून कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक चार हजार ३२९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तीन हजार ४७० रुग्ण उपचार घेत आहेत.
ठाणे पालिका क्षेत्रात २८५७ रुग्ण उपचार घेत आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये १६२८, ठाणे ग्रामीणमध्ये १४८२, उल्हासनगमध्ये ६२९, अंबरनाथमध्ये ३७८, बदलापूरमध्ये ३३७ आणि भिवंडीत केवळ २१९ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: CoronaVirus More active patients in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.