शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: प्रतिबंधित क्षेत्रात फिरती विसर्जन व्यवस्था, ठाणे महापालिका आयुक्तांची अभिनव संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:14 IST

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून त्यासाठी कृत्रीम तलावासोबतच स्विकृती केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. 

ठाणे - राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्रात राहात असलेल्या नागरिकांना श्री गणेशाच्या विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या अभिनव संकल्पनेमुळे प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती बाहेर पडल्यामुळे होणारी संसर्गाची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे.ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून त्यासाठी कृत्रीम तलावासोबतच स्विकृती केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीव्दारे गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींग योजनाही राबविण्यात येत आहे.  तथापि प्रतिबंधित क्षेत्रातील गणेश मुर्तींचे विसर्जन घरीच करण्याविषयी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून फिरती विजर्सन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या संकल्पनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रीम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनायाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून महापालिकेने तयार केलेल्या या फिरत्या विजर्सन व्यवस्थेतंर्गत श्री गणेशाचे कृत्रीम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधीवत विसर्जन करण्यात येते त्याच पध्दतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे. महापालिकेच्या तीन परिमंडळांमध्ये तीन वाहनांव्दारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असून राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली फिरती विसर्जन व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका