शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus ठाण्यात कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची प्रसूती; बालिकेचा जन्म 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 20:17 IST

कोविड रुग्णालयातील पहिली यशस्वी सीझर प्रसूती ; मायलेकींची प्रकृती स्थिर

- पंकज रोडेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: येथील जिल्हा कोविड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची गुरुवारी यशस्वी सीझर शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली. त्या महिलेची पहिली प्रसूती सीझर झाली असल्याने दुसरी प्रसूतीही सीझर करावी लागली. कोविड रुग्णालयात जन्माला आलेल्या त्या नवजात बालिकेचे रुग्णालयातील डॉ वंदना पाटील यांच्या हस्ते बेबी किट देत स्वागत केले. या प्रसूतीनंतर त्या बालिकेचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच जिल्ह्यातील ही पहिलीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची प्रसूती असल्याची माहिती ठाणे रुग्णालय प्रशासनाने दिली.

 संबंधित महिला ही कल्याण येथील रहिवासी असून तिचे वय 25 वर्ष आहे. त्या बाळंतिणीला 4 मे रोजी उपचारार्थ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास त्या महिलेची प्रसूती झाली त्या महिलेने एका गोंडस 2.8 किलो वजनाच्या बालिकेला जन्म दिला. ही सीझर प्रसूती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार,डॉ.नेताजी मुळीक,डॉ सृजित शिंदे,डॉ.प्रसन्ना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ.अर्चना आखाडे यांनी केली तर भूलतज्ञ म्हणून डॉ प्रियंका महागडे या उपस्थित होत्या. 

डॉ.साधना तायडे यांची रुग्णालयाला भेटसार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांनी गुरुवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी,त्यांनी रुग्णालयातील नियंत्रण कक्षेतून सेंट्रल साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमधील उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.तसेच त्यांनी डॉक्टर,नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्याचबरोबर त्यांनी रुग्णालयामार्फत सुरू असलेल्या कामाचे कौतुकही केले आहे.याप्रसंगी, त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलाश पवार उपस्थित होते.

प्रसूती तसेच डायलेसिस याचे रुग्ण येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्या प्रमाणे रुग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही प्रसूती यशस्वी झाली असून बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती स्थिर आहे. ही जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेची पहिलीच प्रसूती आहे.-डॉ.कैलाश पवार , जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस