CoronaVirus News: उल्हासनगरात एकाच दिवशी १५ कोरोना रुग्ण सापडले; पालिका प्रशासन चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:41 PM2020-05-09T16:41:13+5:302020-05-09T16:41:55+5:30

शहरातील कोरोना रुग्णाची संख्या ३३; पालिका प्रशासनाची झोप उडाली

CoronaVirus Marathi News 15 corona patients found in Ulhasnagar in one day takes toll to 33 | CoronaVirus News: उल्हासनगरात एकाच दिवशी १५ कोरोना रुग्ण सापडले; पालिका प्रशासन चिंतेत

CoronaVirus News: उल्हासनगरात एकाच दिवशी १५ कोरोना रुग्ण सापडले; पालिका प्रशासन चिंतेत

googlenewsNext

उल्हानगर : कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील १० जणांसह एकूण १५ जणांचा अहवाल शुक्रवारी उशीरा रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली. शहरातील कोरोना रुग्णाची संख्या ३३ झाली असून सम्राट अशोकनगर, गोलमैदान व शांतीनगर परिसर महापालिकेने सील केला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं ३ सम्राट अशोकनगरमधील कोरोना संसर्ग झालेल्या महिलेच्या संपर्कातील तब्बल १० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. तसेच शांतीनगर येथील कोरोना बाधित पोलिसाच्या संपर्कातील दोघांना, चोपडा कोर्ट येथील दोघांना व गोलमैदान येथील एकाला असे एकूण १५ जणालाकोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा आला. एकाच दिवशी तब्बल १५ कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील कुटुंब सदस्यांसह इतरांना क्वारंटाईन करण्यात आले. 

कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील एक महिला गेल्या आठवड्यात उपचार करण्यासाठी गेली होती. मात्र तीला कोरोनाचे लक्षणे दिसू लागल्याने, कोरोना तपासणी करण्यात आली. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खाजगी रुग्णालयाने कोणाला काही न सांगता महिलेला रुग्णवाहिकेतून तीच्या अल्पवयीन मुलासह मध्यवर्ती रुग्णालयात सोडून दिले. सदर प्रकार समाजसेवक शिवाजी रगडे यांना माहीत झाल्यावर त्यांची माहिती महापालिका आयुक्तासह रुग्णालय प्रशासनाला दिल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबासह इतर १० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांना दिली.

Web Title: CoronaVirus Marathi News 15 corona patients found in Ulhasnagar in one day takes toll to 33

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.