शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कोरोना फायटरसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरु करा, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 21:15 IST

CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने ही शहरे रेड झोनमध्ये आहे.

ठळक मुद्दे'कोरोना फायटरना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल खचून कोरोनाची लढाई दुबळी ठरु शकते.'

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोना फायटर म्हणून कार्यरत आहे. ते ज्या ठिकाणी काम करीत आहे. त्याच ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यांच्या तपासणीकरीता ठिकठिकाणी तपासणी केंद्रे उभारली जावीत. त्याचबरोबर स्वतंत्र कोरोना रुग्णालय सुरु करण्याची मागणी कल्यण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याने ही शहरे रेड झोनमध्ये आहे. या रेडझोनमध्ये सरकारी कर्मचारी, नर्स, पोलीस, डॉक्टर तसेच खाजगी रुग्णालयात काम करणारा स्टाफ आहे. जे नवे रुग्ण सापडत आहे. हे या कर्मचा-यांना कोरोना झाल्याने त्यांच्या संपर्कात आल्याने लागण झालेले रुग्ण आहेत. नर्स, पत्रकार, पोलीस, डॉक्टर, खाजगी रुग्णालयात व सरकारी रुग्णालयात काम करणारा आरोग्य कर्मचारी हे सगळे कोरोना फायटर आहे. जे उपनगरात राहतात.

कल्याण डोंबिवली व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राहणारे कोरोना फायटर रोज मुंबईत कामानिमित्त जातात. अत्यावश्यक सेवा देत आहे. कोरोना फायटरना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल खचून कोरोनाची लढाई दुबळी ठरु शकते. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कोरोना फायटरची नोंद घेऊन. ते ज्या ठिकाणी काम करतात. त्याच ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या कुटुंबासह करावी. त्यांची दररोज तपासणी केली जावी. तसेच त्यांच्याकरीता स्वतंत्र कोरोना सुरु करावे. कोरोना फायटरचे आरोग्य सुरक्षित राहिले तर ते अन्य कोरोना रुग्णांना बरे करु शकतात. तेच जर कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले तर कोरोनाचा लढा लढणार कोण? याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसेdombivaliडोंबिवली