शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू ; नव्याने 182 रुग्ण सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 22:03 IST

शनिवारी जिल्ह्यात 184 रुग्ण आढळून आले असताना रविवारी ही 182 रुग्णांची नव्याने नोंद केली गेली आहे. यामध्ये 82 जण हे फक्त नवीमुंबईतील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रविवारी ही ठाणे जिल्ह्यात 182 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ही 2,188 इतकी झाली असून रविवारी जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत रुग्णांची संख्या 58 वर पोहोचली आहे. तसेच नवीमुंबईत रविवारी सर्वाधिक 82 रुग्ण नोंदवले गेले आहेत.तर अंबरनाथमध्ये एकाच नव्या रुग्णांची नोंद केली गेली आहे. तसेच ठामपातील रुग्णांनी सातशे आणि नवीमुंबईने साडेसहाशेचा टप्पा पार केला आहे. भिवंडीत पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.              शनिवारी जिल्ह्यात 184 रुग्ण आढळून आले असताना रविवारी ही 182 रुग्णांची नव्याने नोंद केली गेली आहे. यामध्ये 82 जण हे फक्त नवीमुंबईतील आहेत.या नव्या रुग्णांमुळे नवीमुंबई ची रुग्ण संख्या 674 झाली आहे. त्याचबरोबर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ही 14 वर गेला आहे. त्यापाठोपाठ ठामपामध्ये 41नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 712 वर पोहोचली आहे. तसेच ठामपा हद्दीत ही दोघांचा मृत्यू झाला असून तेथील मृत संख्या 25 झाली आहे. केडीएमसी कार्यक्षेत्रात 16 रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्ण संख्या 321 झाली आहे.तसेच एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 5 झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही 17 नवे रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या 94 झाली आहे. तर मिराभाईंदर मध्ये 14 नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 256 वर गेली आहे. भिवंडी आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी 4 रुग्ण आढळून आले आहेत. तेथील अनुक्रमे रुग्ण 25 आणि 38 झाली आहे. मात्र भिवंडीत रविवारी पहिला कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. बदलापूर येथे 3 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 54 झाली आहे.तर एक रुग्ण नव्याने सापडलेल्या अंबरनाथची रुग्ण संख्या 14 झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

 रविवारी जिल्हा रुग्णालयातून 27 जणांना डिस्चार्जनव्या नियमावलीनुसार उपचार कालावधीत सुधारणा केली आहे. त्यानुसार रविवारी ठाणे जिल्हा सामान्य (कोविड) रुग्णालयातून 27 जणांना डिस्चार्ज दिला आहे. यामध्ये ठामपामधील 15, मिराभाईंदर-4, ठाणे ग्रामीण-6, नवीमुंबई आणि वसई- विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस