शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:20 IST

KDMC Coronavirus News : मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाला. आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार रुग्ण आढळले, तर एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये रुग्ण वाढायला लागले. जुलैमध्ये एका दिवसाला ६०० च्या आसपास व त्याहीपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते.

कल्याण :  कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के झाले आहे. रुग्ण बरे होण्याचा हा दर एमएमआर रिजनमध्ये अव्वल ठरला आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णदुपटीचा दर (डबलिंग रेट) २०९ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे ही बाब समाधानकारक आहे.मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाला. आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार रुग्ण आढळले, तर एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये रुग्ण वाढायला लागले. जुलैमध्ये एका दिवसाला ६०० च्या आसपास व त्याहीपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. मनपाने त्यावर मात करण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले. तापाचे दवाखाने सुरू केले. सर्वेक्षणावर जास्त भर दिला. जम्बो कोविड केअर सेंटर व रुग्णालये सुरू केली. ‘फॅमिली डॉक्टर कोविडयोद्धा’ ही मोहीम राबविली. सध्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत पाच लाख १५ हजार घरांचे सर्वेक्षण केले. काही काळापुरते धारावी पॅटर्न, डोंबिवली पॅटर्न असेही प्रयोग केले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. आज दिवसाला केवळ १५० ते २०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत असून, ही समाधानकारक बाब आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.मनपा हद्दीत कोरोनाबाधितांचा मृत्युदर हा दोन टक्क्यांच्या आत आहे. तर, रुग्णदुपटीचा दर २०९ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना रुग्णदुपटीचा दर कमी झाला, तर त्याचा फारसा फरक पडत नाही. पण ती एक जमेची बाजू ठरते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १०० टक्क्यांवर पोहोचवण्याचे लक्ष्य मनपाचे असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. 

दिवसाला दोन हजारांपर्यंत चाचण्यामनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या, दररोज दोन हजारांपर्यंत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. मनपाने आतापर्यंत आरटीपीसीआर आणि ॲण्टीजेन, अशा दोन्ही मिळून एक लाख ९५ हजार चाचण्या केल्या आहेत. चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर हा १० टक्क्यांच्या आतच आहे. तो आजमितीस सहा टक्के आहे. मनपाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यात जी घरे सुटली होती, त्यांचे सर्वेक्षण केले जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHealthआरोग्य