शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:58 PM

टिटवाळ्य़ात कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता कोरोना टिटवाळ्य़ातही पोहोचला आहे.  

कल्याण- कल्याण-डोंबिवलीत आज कोरानाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एका शासकीय रुग्णालयात काम करणा-या आयांचा समावेश आहे. ही आया टिटवाळा परिसरात राहणारी आहे. अन्य दोन रुग्णांपैकी एक कल्याण पूर्वेतील व एक जण डोंबिवली पूर्वेतील आहे. 3 नवे रुग्ण आढळून आल्याने महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 38 झाली आहे. टिटवाळ्य़ात कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता कोरोना टिटवाळ्य़ातही पोहोचला आहे. टिटवाळ्य़ातील आया ही शासकीय रुग्णालयात कामाला आहे. 44 वर्षीय आयाला कोरोनाची लागण झाली आहे. टिटवाळ्य़ात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता टिटवाळ्य़ातही कोरोना पोहोचला आहे. महापालिकेची हद्द टिटवाळ्यापर्यंत आहे. टिटवाळा परिसर हा महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रंतर्गत येतो. या आया महिलेच्या संपर्कात अन्य कोणी आले असल्यास त्यालाही कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कल्याण पूर्वेतील 40 वर्षीय महिला ही कोरोनाबाधित रुग्णांच्या सान्निध्यात आल्याने व डोंबिवलीतील 38 वर्षीय रुग्ण हा डोंबिवलीतील लग्न सोहळ्य़ाशी संबंधित कोरोनाबाधित झाला आहे.कोरोनामुळे यापूर्वी कल्याण व डोंबिवलीतील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35 होती. नव्या तीन रुग्णांमुळे हा आकडा 38 च्या घरात पोहोचला आहे. यापूर्वीच्या 35 कोरोनाबाधितांपैकी सात जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण परिसरातील 27 गावातील निळजे परिसरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून होता. त्यापाठोपाठ टिटवाळ्य़ात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे कोरोनाने आत्ता शहर केंद्रीत दाट लोकवस्ती वगळता ग्रामीण भागातही डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.-------

कोरोनाग्रस्तांच्या घरातील कचरा बायोमेडिकल वेस्टला देणे बंधनकारककोरोनाग्रस्त रुग्णांच्या घरातील कचरा, बेडसीट, वापरलेला मास्क हा बायोमेडिकल वेस्टला देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर होम क्वॉरंटाइन झालेल्या रुग्णांच्या घरातील कचरा व ज्या सोसायटय़ा कोरोना रुग्णामुळे सील केल्या आहे. त्यातील कचरा जनरल कचरा व घंटा गाडय़ाकडे जमा न करतो तो बायोमेडिकल वेस्टला देणे बंधनकारक आहे. हा कचरा बायोमेडिकल वेस्टला दिला नाही तर संबंधितांच्या विरोधात साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये कायेदशीर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेचा उंबर्डे येथे बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कार्यान्वित आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस