शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी जनकल्याण समिती, युवकांचा पुढाकार, डोंबिवलीत घरोघरी जाऊन करणार स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 01:19 IST

डोंबिवली, कल्याण आदी भागात जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशा ठिकाणी हे कोरोना योद्धे कार्यरत राहतील. त्यांना रोज पाच तास याप्रमाणे सात दिवस हे काम करावे लागणार आहे.

डोंबिवली - धारावी, पुणेपाठोपाठ आता डोंबिवलीतही कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते निवडून त्यांच्यामार्फत काही निवडक भागामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान तपासणी (स्क्रिनिंग) करण्यात येणार आहे, ही मोहीम मंगळवारी सुरू होणार असून आ. रवींद्र चव्हाण, समितीचे जिल्हा कार्यवाह निलेश काळे यांनी त्यासंदर्भात शुक्रवारी सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळ, दहीहंडी मंडळ, नवरात्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.जनकल्याण समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कोरोना योद्धे काम करतील आणि संकलित झालेली माहिती महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सुपूर्द करतील, असे चव्हाण म्हणाले. डोंबिवली, कल्याण आदी भागात जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, अशा ठिकाणी हे कोरोना योद्धे कार्यरत राहतील. त्यांना रोज पाच तास याप्रमाणे सात दिवस हे काम करावे लागणार आहे. शहरातील काही शाळांमध्ये एका शाळेत ४० याप्रमाणे या युवकांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्या युवकांना पीपीई किट घालणे अत्यावश्यक आहे, तसेच त्यांची रोज आरोग्यतपासणी होणार आहे. त्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. जनकल्याण समिती, महापालिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ते कार्यरत राहतील.या विषयासंदर्भात महापालिका आयुक्तांसमवेत अलीकडेच एक महत्त्वाची बैठक संघाचे पदाधिकारी, माजी आ.डॉ. अशोक मोडक आणि आ. चव्हाण यांच्यासमवेत झाली. ज्या युवकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी जनकल्याण समितीच्या माध्यमातून आॅनलाइन वितरित करण्यात आलेला फॉर्म भरावा. आधारकार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटो जमा करावे. त्यानंतर, त्यांची आरोग्यतपासणी करण्यात येणार आहे. देशकार्यात जास्तीतजास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे जिल्हा कार्यवाह निलेश काळे यांनी केले. लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने वस्त्यांमधील रहिवाशांची तपासणी व्हावी, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली