शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: काम करायचे नसल्यास लिहून द्या! केडीएमसीकडून तक्रार न ऐकता कर्मचाऱ्यांना दमदाटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 00:25 IST

रुग्णालयातील चालक, मदतनिसांची व्यथा

मुरलीधर भवार 

कल्याण: कोरोनाची मुकाबला करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयात दिवसरात्र रुग्णवाहिका सेवा पुरवणाऱ्या चालक आणि मदतनीस यांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यांची मागणी पूर्ण करण्याऐवजी काम करणार नसाल तर लेखी द्या, असा दम अधिकारी देत आहेत. त्यामुळे आपली व्यथा कोणाकडे मांडायची, असा सवाल उपस्थित केला असून त्यांनी त्यांच्या सहीनिशी एक निवेदन आयुक्तांना दिले आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णवाहिका आणि शववाहिनी या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांवर काम करणारे चालक व मदतनीस मिळून २० जण आहेत. या चालक व मदतनिसांचा कोरोना रुग्ण आणि संशयिताशी थेट संपर्क येत आहे. रुग्णांना घरातून घेऊन येणे. त्यांना उचलून रुग्णालयात दाखल करणे हे काम हे चालक आणि मदतनीस करत आहेत. त्यांना आणखीन पाच मदतनीस वाढवून पाहिजेत. त्यांना मदतनीस वाढवून दिले जात नाहीत. तीन शिफ्टमध्ये हे चालक व मदतनीस काम करत आहेत. अशा परिस्थितीत आजदे गावातील एका इमारतीत रुग्ण आढळल्याने ती इमारत सील करण्यात आली. त्याच इमारतीत रुग्णवाहिकेवरील एक चालक राहत होता. त्याला होम क्वारंटाइन केल्याने एक चालक कमी आहे.

परिवहन उपक्रमातील काही चालक पुरवल्यास २० जणांवरील ताण कमी होऊ शकतो. २४ मार्चला लॉकडाउन जाहीर झाल्यापासून शास्त्रीनगर हे कोरोना रुग्णालय जाहीर केले गेले. तेव्हापासून आजपर्यंत या २० जणांची कोरोना चाचणी केलेली नाही. या विविध मागण्यांवर तोडगा काढण्याऐवजी त्यांना काम करायचे नाही तर लिहून द्या असा दम भरला जात आहे. या २० जणांनी आता आयुक्तांकडे निवेदन दिले आहे. आयुक्त याप्रकरणी काय दखल घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पेट्रोल खर्च, राहण्याची सोय करण्याची मागणीवीस जणांपैकी पाच जणच कल्याण-डोंबिवलीत राहतात. उर्वरित १४ जण हे आसनगाव, बदलापूर, टिटवाळा, ठाणे भागातून स्वत:च्या दुचाकीने येतात. परिवहन बसची सुविधा असली तरी त्या वेळेवर नाहीत. त्यामुळे स्वखर्चाने कर्तव्य बजावणाऱ्यांना पेट्रोल खर्च मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना घरी जावे लागत असून त्यांची डोंबिवलीत राहण्याची व्यवस्था करावी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस