शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पगारासाठी पैसे नसल्यानं होमगार्डची सेवा स्थगित; पोलिसांवरचा ताण वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:15 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांच्या मदतीला ५०० होमगार्ड पाठवले होते.यापैकी ४३५ होमगार्ड ठाणे शहर पोलिसांना मिळाले होते.

ठाणे : कोरोनाविरूद्धच्या लढाईत ठाणे शहर व ग्रामिण पोलीस दलासोबत लढण्यासाठी होमगार्ड फौज आली होती. मात्र, तब्बल ३८ दिवसांची सेवा बजावल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील या सर्व होमगार्डसची सेवा स्थगित केल्याचे आदेश जिल्हा समादेशक यांनी दिले आहेत. या होमगार्डची सेवा स्थगित केल्याने कमी होणाऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर आता कळत नकळत ताण वाढणार आहे. त्यातच होमगार्डची सेवा त्यांना पगार देण्यास पैसे नसल्याने स्थगित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहर पोलीस दलात सात ते आठ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची फौज आहे. ती ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. यापैकी २५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून यातील काही पोलीस अधिकारी कोरोनावर मात करत पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. तर या लढाईत लढताना १५० च्या आसपास पोलिसांना संस्थात्मक आणि होम क्व ारंटाइन केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांच्या मदतीला ५०० होमगार्ड पाठवले होते.यापैकी ४३५ होमगार्ड ठाणे शहर पोलिसांना मिळाले होते. ते कर्तव्यावर हजर झाल्याने त्यांचे मानधन जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन निधीतून अदा करण्यात येणार आहे. मात्र, तब्बल ३८ दिवसांची सेवा बजावल्यानंतर या होमगार्डचा ठाणे ग्रामीण, नवी मुंबई ,ठाणे शहर हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यातील कोरोना बंदोबस्त ३ मे पासून स्थगित केला आहे. तसे आदेशच ठाणे जिल्हा समादेशक यांनी काढले आहेत.शहर पोलीस दलाला ५०० होमगार्ड मंजूर झाले होते. त्यातील ४३५ होमगार्ड मिळाले होते. ते आता परतले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच पोलिसांवर ताण येणार आहे. या लढाईत लढणाºया पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. तर, काही जणांना संस्थात्मक तर काहींना होम क्वारंटाइन व्हावे लागले आहे. होमगार्डपैकी कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. - बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे शहर (विशेष शाखा)

टॅग्स :Policeपोलिस