शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

coronavirus: लॉकडाऊन संदर्भात लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, एकनाथ शिंदे यांची सूचक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:49 IST

coronavirus in Maharashtra : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ठाणे  - आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेण्यात येणार आहे तो लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तो  निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत . राज्यात लस आणि रेमडीसीव्हरच्या इंजक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना या दोन्हीचा साठा कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे केंद्राशी बोलणे सुरु असून राज्याच्या लोकसंख्येनुसार केंद्राने लस उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वडील, पत्नी तसेच स्वतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या सामान्य रुग्णालयात जाऊन आज लस घेतली असून यावेळी त्यांनी इतरांना देखील लस घेण्याचे आवाहन केले. राज्यासह ठाणे जिल्ह्यात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील काही लसीकरण सेंटर असाक्षरशः बंद ठेवावी लागली आहे. ठाणे महापालिका हद्दीत तर आज आणि उद्या लसीकरण केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत विचारणा केली असता कोणत्याही परिस्थितीमध्ये लस कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या अधिक आहे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा अधिक वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या भागात अधिक तपासण्या करण्यासोबतच आरोग्य कर्मचारी देखील वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेमडीसीव्हरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत कोरोना हे मोठे संकट असून सर्वानी एकत्र येऊनच या संकटाचा सामना करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अशा संकट समयी काळबाजार करण्याची भूमिका योग्य नव्हे असे त्यांनी सांगितले आहे. 

वेळ पडल्यास हॉटेल ताब्यात घेणार कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आता बेड देखील कमी पडत आहे. कोणत्याच नागरिकाला बेड मिळणार नाही अशी एकही तक्रार येता कामा नये यासाठी वेळ पडल्यास पुन्हा एकदा खाजगी हॉटेल्स देखील ताब्यात घेण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEknath Shindeएकनाथ शिंदे