शहरं
Join us  
Trending Stories
1
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
2
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
3
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
4
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
5
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
6
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
7
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
8
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
9
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
10
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
11
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
12
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
13
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
14
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
15
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
17
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
18
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
19
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
20
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: वेळेत रुग्णवाहिका आणि उपचार न मिळाल्याने कोरोना लढवय्याचा मृत्यू; ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 20:38 IST

ठाण्यातील राबोडी आकाशगंगा या परिसरात राहणारी एक महिला ही सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होत्या

ठाणे :  मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका न मिळणे, रुग्णवाहिके अभावी रुग्णांची मृत्यु होणे असे प्रकार घडत आहेत. या मुद्यांवरून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांन चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर झोपी गेलेल्या महापालिकेने तीन परिमंडळाअंतर्गत 10 ते 15 रुग्णवाहिकेची सुविधेसह टीएमटीच्या मिडी बसेसचे रुपातंर रुग्णवाहिकेमध्ये केले. असे असतांना, देखील शनिवारी ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या व सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट असलेल्या एका महिलेचा रुग्णवाहिका व वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महापालिका हद्दीत रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

ठाण्यातील राबोडी आकाशगंगा या परिसरात राहणारी एक महिला ही सायन रुग्णालयात स्टोअर असिस्टंट म्हणून गेल्या 15 वर्षापासून कार्यरत होत्या. त्यात सोमवार पर्यंत त्या कामावर होत्या. तसेच गुरुवारी 11 जून रोजी त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोविड टेस्ट केली. 12 जूनरोजी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांना दूरध्वनी करून टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळविण्यात आले होते. याची माहिती मिळताच, घरातील सदस्यांनी स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयात धाव घेवून, रुग्णवाहिका व रुग्णालयात जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, रुग्णवाहिका काही वेळेवर मिळाली नाही. तब्बल चार ते पाच तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना रुग्णवाहिका मिळाली. त्यात ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेच्या पतीने सायन रुग्णालयाच्या मॅडमला फोन केला असता, त्यांनी सायन हॉस्पीटल येथे आणा असे सागितले. त्यानुसार त्यांना सायन रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासले असता, त्यांचा प्रवासाद्र्म्यांच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या सर्व घटनेमुळे एखाद्या करोना लढवय्या सायन हॉस्पीटल येथे काम करणारा व्यक्तीची हि अवस्था होत असले तर, सर्वसामान्य माणसांची  काय अवस्था असेल? असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे. 

सोमवार पर्यत कामावर गेल्या मंगळवार पासून तब्येत बरी नाही म्हणून गेल्या नाहीत. मंगळवारपासून स्थानिक डॉक्टर कडून उपचार घेतले व रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या खचल्या त्यात उपचार मिळण्यास काहीही कारण नसताना उशीर झाला, वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता - राजेंद्र पद्मन, मृताचे नातेवाईक.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका