शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दिवस ऑनलाइन स्पर्धा, कार्यक्रमांचे; लॉकडाउनमुळे सोशल मीडियाद्वारे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 23:53 IST

एरव्ही, उन्हाळी सुट्या म्हटले की, या काळात नवनवीन कार्यक्रमांची रसिकांसाठी पर्वणीच असते. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे.

स्नेहा पावसकर ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी घरात राहण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र या सक्तीच्या सुट्यांच्या दिवसात घरात बसून कंटाळणाऱ्या लोकांना काही विरंगुळा किंवा त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने काही संस्था, लोकप्रतिनिधी, मंडळे यांच्यावतीने विविध आॅनलाइन स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजिल्या जात असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वजण गेल्या दीड महिन्यापासून घरातच आहोत. काही जणांना वर्क फ्रॉम होम असले तरी इतर घरात बसून कंटाळले आहेत. मात्र या लॉकडाउनच्या काळात घरातच थांबून बुद्धिला चालना देणारे असे अनेक आॅनलाइन उपक्रम सध्या राबविले जात आहेत. ठाण्यातील काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी सोशलमीडियाच्या माध्यमातून चित्रकला, कथालेखन, काव्यलेखन स्पर्धा आयोजिल्या आहेत. या सगळ्यासाठी विषयही कोरोनाच आहे आणि विविध वयोगटानुसार त्या घेतल्या जात आहेत. ही चित्रे दिलेल्या इमेलआयडीवर किंवा मोबाइलवर व्हॉटस्अ‍ॅप करायची असल्याने नागरिकांचाही घरबसल्या त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. काही संस्थांतर्फे कथावाचन, काव्यवाचन स्पर्धा आयोजिल्या जात असून सादरीकरणाचे व्हिडीओ पोस्ट करण्याचे सुचवले जाते. त्यानुसार अनेकजण या स्पर्धांत भाग घेऊन व्हिडीओ शेअर करताना दिसतात. महिलांसाठी आॅनलाइन पाककला प्रशिक्षणाचे सत्रही काहींनी सुरू केलेले आहे.एकूणच हा कोरोना संपेपर्यंत असे आॅनलाइन उपक्रम आम्ही रसिकांसाठी सादर करू, मात्र कोरोनानंतरही लोकांना याची सवय होऊ नये, अन्यथा कार्यक्रम स्थळी पाहायला येणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी चिंता एका कवीने व्यक्त केली.एरव्ही, उन्हाळी सुट्या म्हटले की, या काळात नवनवीन कार्यक्रमांची रसिकांसाठी पर्वणीच असते. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. तरीही, रसिकांना घरबसल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने काही संस्था किंवा काही कवी मंडळी एकत्र येऊन सोशल मीडियावर छोटेखानी संमेलने घेत आहेत आणि त्याला रसिकही कमेंटच्या माध्यमातून उत्तम दाद देत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया