शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:31 IST

आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत तब्बल एक लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, जिल्ह्यासाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. एकूण एक लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत तीन हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा मृत्युदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनांसमोर आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातही मार्चपासूनलॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये त्याचा फैलाव जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी होताना दिसून आला. जून आणि जुलैमध्ये तर रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही मिळणे मुश्कील होऊन बसले होते. परंतु, जुलै महिन्याच्या मध्यानंतर आणि आॅगस्टमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक कमी होऊ लागली.

जिल्ह्यातील महापालिकांनी केलेल्या उपाययोजना, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया आदींसह पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय मंडळींनी घेतलेली काळजी, नागरिकांप्रति केलेली जनजागृती यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बºयाच प्रमाणात यश आले आहे. जुलैपर्यंत प्रतिदिन दीड हजार ते दोन हजार रुग्ण आढळत होते. परंतु, आॅगस्ट महिन्यात ही संख्या खाली आली आहे. सोमवारी जिल्ह्यात ८५९ रुग्ण आढळले आहेत. या यशाचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. आता मृत्युदर रोखण्यासाठीही ठाणे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यात एका कोविड सेंटर रुग्णालयापाठोपाठ आता कळवा, मुंब्य्रातही हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनामुक्तीठाणे 22004कल्याण-डोंबिवली 23095नवी मुंबई 19668मीरा-भार्इंदर 9825उल्हासनगर 7059भिवंडी 3612अंबरनाथ 4231बदलापूर 3493ठाणे ग्रामीण 7075

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या