coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:28 AM2020-09-05T02:28:28+5:302020-09-05T02:28:59+5:30

केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.

Coronavirus: Coronavirus death toll rises to 1.08 per cent in KDMC, total death rate rises to 2.17 per cent | coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

Next

- प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून, रुग्णसंख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के असले, तरी मृत्युदर मागील काही महिन्यांच्या तुलनेत १.०८ टक्क्यांनी वाढला आहे. आधी १.०९ टक्के असलेला मृत्युदर सध्या २.१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी हद्दीतील मृत्युदर कमी असल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केला आहे.
केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. १४ मार्च ते ८ जूनपर्यंत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जूनअखेरीस ही संख्या पाच हजार १३ ने वाढून सहा हजार ५७५ वर पोहोचली. तर, मृतांची संख्या १२० झाली. सुरुवातीला प्रतिदिन दोनचार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. त्यावेळी मृत्युदर हा १.०९ टक्के होता. परंतु, अनलॉक झाल्यापासून कोरोनामुळे दररोज सरासरी नऊ ते ११ दरम्यान मृत्यू होत आहेत. परिणामी, मृत्युदर २.१७ टक्क्यांवर गेला आहे. ३ सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४ पर्यंत गेली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, २६ हजार ११२ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असले तरी, आतापर्यंतची मृतांची संख्या ६५६ झाली आहे.
केडीएमसी हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबरच मनपा हद्दीतील जे रुग्ण मुंबईसह उपनगरांत उपचार घेत आहेत, त्यांचाही मृत्यूनंतर केडीएमसीच्या संख्येत समावेश होत आहे. तर, अनलॉक आणि नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोरोनाची लक्षणे आढळलेले रुग्ण वेळेवर कोरोनाची चाचणी करीत नाहीत. डेंग्यू आणि मलेरिया झाल्याचा समज करून कोरोनाची चाचणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण पुढे गंभीर बनतो आणि पुढे त्याला अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागतात. जर, त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच डायलेसिस करावे लागत असेल, तर गंभीर अवस्थेतील रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. हेच कारण मृतांची संख्या वाढण्यामागे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

वेळीच उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, कोरोनाचे निदान करण्यासाठी अ‍ॅण्टीजेनसारख्या मोफत चाचण्या केडीएमसीकडून सर्वत्र होत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तसेच उपचारासाठी येणाºया तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना फॅमिली डॉक्टरांनी कराव्यात, असे आवाहन केडीएमसीच्या साथरोग प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

Web Title: Coronavirus: Coronavirus death toll rises to 1.08 per cent in KDMC, total death rate rises to 2.17 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.