शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मीरा रोडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; कोरोना रुग्णांची संख्या दिवसभरात ५ने वाढून थेट २२वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 19:56 IST

गेल्या दिवसभरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या २२ झाली आहे.

मीरा रोड - मीरा रोडच्या पूजानगरमधील ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मीरा भाईंदरमध्ये कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. तर कोरोनाचे दोन रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक बातमी पालिकेने दिली आहे. गेल्या दिवसभरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या २२ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पालिकेने सुरू केलेल्या मंडई आता सकाळी ९ ते दु. १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवल्या जाणार आहेत.मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा आज पहिला बळी गेला आहे. पूजानगरमधील सदर ५० वर्षीय इसम हा जोगेश्वरीच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल होता. आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. पालिकेने पूजा नगर व परिसरात निर्जंतुकीकरण तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. परिसर बंद केला आहे. सदर रुग्णाची माहिती आजच पालिकेला मिळाली. नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमध्ये भाईंदरच्या गोडदेव भागातील ३० वर्षीय तरुण, एमआय मस्जिद - आदर्श शाळेजवळील ३६ वर्षीय इसम व मीरा रोडच्या आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यूमधील ७३ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या सर्वांना पालिकेच्या जोशी रुग्णालयात दाखल केले आहे. आरएनए ब्रॉडवेमध्ये या आधी एक महिला रुग्णास कोरोना झाल्याने दाखल केले असून, नव्याने आढळलेले दोन रुग्ण हे त्याच ठिकाणीचे आहेत.कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, घरीच रहावे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले आहे. पालिका मंडईत लोकांना सांगून देखील गर्दी कायम असल्याने काशी व उत्तन येथील बाजार बंद केले असून अन्य पालिका मंडई आता फक्त सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरू ठेवल्या जाणार आहेत. सर्दी, खोकला व ताप सारखी लक्षणे आढळल्यास त्वरित पालिका वैद्यकीय विभागाशी संपर्क साधा, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस