शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अंबरनाथमध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या घरातील दोघांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 17:13 IST

त्याच्या मृत्यूनंतर लागलीच वैद्यकीय पथकाने त्याच्या जवळील नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचे आणि मुलाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते.

अंबरनाथ: अंबरनाथ बुवापाडा भागात गेल्या आठवड्यातच एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली होती. जवळील नातेवाईकांपैकी पत्नी आणि मुलाला त्याचा संसर्ग झाला नाही हे समोर आले होते. मात्र त्या मृत व्यक्तीच्या इतर दोन नातेवाईकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील बुवापाडा भागात एका 50 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. त्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर लागलीच वैद्यकीय पथकाने त्याच्या जवळील नातेवाईकांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात त्या मृत व्यक्तीच्या पत्नीचे आणि मुलाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते. तर इतर नातेवाईकांना रुग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते. त्याच नातेवाईकांपैकी दोघांचे रिपोर्ट आता कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.बुवापाडा येथे ज्या इसमाला कोरोनाची पहिली लागण झाली होती ती व्यक्ती उत्तर प्रदेशमधून आपल्या गावी जाऊन आली होती. मात्र त्याला इतर त्रास जाणवल्याने तो सुरुवातीला अंबरनाथच्या रुग्णालयात आणि नंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल होता. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याला लागलीच भाभा रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू झाल्यावर लागलीच त्याचा मृत्यू देखील झाला.या प्रकारानंतर अंबरनाथच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली होती, त्यात मुलाला आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली नव्हती. त्यामुळे घरातील कुटुंबासहित इतर नातेवाईकांना देखील  क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सुदैवाने कोरोनाची लागण झालेले दोन्ही रुग्ण हे ठाणे  सिव्हिल रुग्णालयात दाखल आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस