शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus : झोपडपट्टीत वाढतोय कोरोना, महापालिका प्रशासनाची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 00:48 IST

कळवा, मुंब्रा, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर आदींसह इतर सर्वच प्रभाग समित्यांत त्याने गुणाकाराने शिरकाव केला आहे.

अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेच्या सर्वच प्रभाग समित्यांमधील झोपडपट्टीत कोरोनाने आपले हातपाय पसरल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. कळवा, मुंब्रा, वागळे, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर आदींसह इतर सर्वच प्रभाग समित्यांत त्याने गुणाकाराने शिरकाव केला आहे. यामुळे ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या २०० पार झाली आहे. झोपडपट्टीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने आणि काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे तसेच महापालिका प्रशासनाच्या चुकांमुळेच त्याने ठाणेकरांचे जगणे हराम केले असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.देशात २१ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाले. या कालावधीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले होते. परंतु, असे असतानाही अनेक नागरिक भाजीखरेदीसाठी, मेडिकलमध्ये जाण्यासाठी या ना त्या कारणासाठी बाहेर पडत आहेत. यामुळे महापालिकेने मार्केट बंद केले. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. उलट झोपडपट्टी भागातील गर्दी काही कमी झालेली नाही. सोसायट्यांमध्ये मास्क, सॅनिटायझर वापरले जात असताना झोपडपट्टी भागात मात्र ते वापर न करताच नागरिक घराबाहेर पडत असूून महापालिकेने कडक नियम करूनही त्यालाही हरताळ फासला गेला आहे. येथील बाजारांमध्ये गर्दी होत आहे. या नागरिकांना पोलिसांचीही भीती नाही. नाक्यानाक्यांवर जथ्थे करून काही मंडळी आजही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासत आहे. त्यामुळेच आता कोरोनाने जोरदारपणे झोपडपट्टी भागात शिरकाव केला आहे.>अशी आहे सध्याची कोरोनाग्रस्तांची संख्यामुंब्य्रात कोरोनाचे ४० हून अधिक रुग्ण आहेत. यामध्ये पोलीसही आहेत. तर, कळव्यात कोरोनाचे 27 हून अधिक रुग्ण, कोपरीत सातहून अधिक रुग्ण सापडले आहे. कोपरीत तर ग्रीन झोन घोषित केला होता. येथील दोन्ही बाजूकडील सीमादेखील बंद केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वागळे इस्टेट प्रभाग समितीत आता रोज तीन ते पाच नव्या रुग्णांची भर पडत आहे. तिकडे उथळसरमध्ये राबोडी कोरोनापासून दूर होते. मात्र, तेथेही कोरोनाने शिरकाव केला असून उथळसर प्रभाग समितीत २७ हून अधिक रुग्ण गेल्या चार ते पाच दिवसांत वाढले आहेत. लोकमान्य-सावरकरनगर भागात तर आठवडाभर विशेष लॉकडाउन घेऊनही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आणि महापालिकेने केलेल्या एका चुकीमुळे येथील रुग्णांची संख्या 25 हून अधिक झाली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील झोपडपट्टीतही आता कोरोनाने शिरकाव करून २० हून अधिक जणांना बाधित केले आहे. वर्तकनगरमध्येही 20 हून अधिक, नौपाडा भागातही ही संख्या वाढताना दिसत आहे. आता तर दिवा प्रभाग समितीमध्येही कोरोनाने शिरकाव करून नागरिकांची झोप उडविली आहे. या भागात तर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पुरता हरताळ फासला आहे. तिकडे माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील मानपाडा गावातही कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे एकूणच सोसायट्यांमध्ये एकेक रुग्ण असलेली संख्या झोपडपट्टीत मात्र गुणाकाराने वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस