शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Coronavirus : वातावरणबदल ठाणेकरांसाठी ठरु शकतो फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:03 IST

सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.

ठाणे : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी हवामानातील बदलही महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवस उष्णतेची लाट सहन करणाऱ्या ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उष्ण कटिबंधातील देशात हा व्हायरस जास्त फैलावू शकत नाही, असे सांगितले जाते. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, ती काळजी करणारी असून त्यावर हे वातावरण कितपत फायदेशीर ठरणार याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.उष्ण कटिबंधातील देशांना किंवा राज्यांना या व्हायरसचा धोका कमी प्रमाणात असल्याचे बोलले जात होते. परंतु, मागील काही दिवसांत ठाण्यातील वातावरण वाढत नव्हते. होळी झाल्यानंतर साधारणपणे वातावरणात बदल होताना दिसते. मात्र, यंदा होळीनंतरही जवळजवळ एक आठवडा वातावरण थंड होते. शनिवारपर्यंत दिवसाचे तापमानही २० ते २२ अंश सेल्सिअसपर्यंतच होते. त्यामुळे वातावरणात गारवा दिसत होता. त्यामुळे हे वातावरण बदलावे आणि उष्ण वातावरण सुरू व्हावे, अशी अपेक्षा तमाम नागरिक व्यक्त करीत होते. अखेर, सोमवारी वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. शहरातील तापमान जवळजवळ ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. अचानक झालेल्या या बदलाचे स्वागत सर्वांनीच केले आहे. आता यामुळे कोरोनाचे सावट कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. परंतु, तसे होईल का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत.सध्या राज्याची परिस्थिती पाहता रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वातावरणबदल हा चांगला असला, तरी काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. सध्या आपण दुसºया स्टेजवर आहोत. पुढील १५ दिवस खूप काळजीचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.- कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे सिव्हिल रुग्णालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणे