शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात सोमवार पासून ब्रेक द चेन, काय होणार सुरू आणि काय बंद, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:36 IST

Break the chain in Thane District: ठाणे , नवीमुंबई दुसऱ्या  स्तरात तर कल्याण डोंबिवली, मिराभाईंदर, भिवंडी,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर आणि मुरबाड तिसऱ्या स्तरात

ठाणे  -  राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा कमी असेल, तसेच ऑक्सीजन बेड २५ टक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहरातील व्यवहार सोमवार पासून सुरळीत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणो जिल्ह्यातही सोमवार पासून काही निर्बंध शिथील करण्यात आले येणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी राजेश नाव्रेवर यांनी जारी केले आहेत. ठाणो, नवीमुंबई या शहरांचा दुस:या स्तरात समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरीत जिल्ह्यातील मिराभाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर, मुरबाड या शहरांचा स्तर तिसरा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार पासून दुस:या स्तरातील र्निबध 5क् टक्के या प्रमाणो आणि तिसऱ्या  स्तरातील र्निबध हे काही अंशी शिथील होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दर आठवडय़ाला प्रत्येक शहरांचा रुग्णदरवाढीचा आणि ऑक्सीजन बेडचा आढावा घेऊन त्यानंतर र्निबध आणखी शिथील करण्यात येणार आहेत.ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि ग्रामीण भागातील रुग्ण दरवाढीचा वेग काहीसा मंदावला आहे. राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा कमी असेल तसेच ज्यांची ऑक्सीजन बेड हे २५ टक्के पेक्षा कमी भरलेले असतील अशांना पहिल्या टप्यात आणले आहे. परंतु रविवारी ठाणो जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीत प्रत्येक महापालिका, नगरपालिका आणि  ग्रामीण भागांचा पॉझीटीव्ही रेट आणि ऑक्सीजन बेडचा सारासार विचार करुन ठाणे  आणि नवीमुंबई वगळता जिल्ह्यातील इतर शहरांचा आणि ग्रामीण भागांचा फेज ३ मध्ये समावेश करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार ठाणे  शहर आणि नवीमुंबईचा दुसऱ्या  स्तरात समावेश करण्यात आला आहे. तर मिराभाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर, मुरबाड या शहरांच तिसऱ्या  स्तरात समावेश करण्यात आला आहे. स्तर ३ मधील रुग्णवाढ हि ८.३२ टक्के आणि ऑक्सिजन बेड २३.८८ टक्के एवढे आहेत. त्यानुसार आता  ठाणे  आणि नवीमुंबईतील व्यवहार बऱ्यापैकी  प्रमाणे  सुरळीत होणार आहेत. तर जिल्ह्यातील भागांचे व्यवहार काही अंशी सुरळीत होणार आहे. त्यानुसार आता टप्याटप्याने ब्रेक दे चेन ठाणे  जिल्ह्यात सुरु झाले आहे. व्यावसायिक , ग्राहक जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करणो गरजेचे असून त्यांनी नियम पाळले तर ब्रेक द चेन होईल परंतु नियम पाळले नाही तर मात्र पुन्हा कडक र्निबध लावले जातील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे  आणि नवीमुंबई ( स्तर -२ )काय सुरु राहील५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरु राहणार, मॉल चित्रपटगृह - ५० टक्के, दुकाने पुर्ववत, लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेकरीता, सार्वजनिक ठिकाणे , मैदाने, सर्व खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये, विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशा वेळेत सुरु राहतील, चित्रिकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती मर्यादा, अंत्यविधीसाठी बंधन नसेल, जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने परवानगी, लग्न सोहळ्यासाठी १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी, सार्वजनिक वाहतुक १०० टक्के क्षमतेने सुरु काय बंद राहीलधार्मिक स्थळे, लोकल प्रवास बंद राहणार आहे.

कल्याण - डोंबिवली, मिराभाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर आणि मुरबाड (स्तर -  ३)काय काय सुरु राहणारअत्यावश्यक दुकाने सांयकाळी ४ वाजेर्पयत सुरु राहणार, इतर आस्थापना या सोमवार ते शुक्रवार या दिवसात ४ वाजेर्पयत सुरु राहणार, रेस्टॉरेन्ट, हॉटेल ५० टक्के क्षमतेने ४ वाजेर्पयत सुरु , सार्वजनिक ठिकाणे , मैदाने, चालणे , सायकलींग सकाळी ५ ते ९ वाजेर्पयत तसेच सांयकाळी ६ ते ९ वाजेर्पयत केवळ मैदानी खेळांना परवानगी असेल, खाजगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु, चित्रिकरण ४ वाजेर्पयत, सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणुक ५० टक्के क्षमतेने ४ वाजेर्पयत, लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत, बांधकामाकरीता ऑनसाईट मजुर असतील त्याठिकाणी सांयकाळी ४ वाजेर्पयत, ऑनलाईन शॉपींग नियमितपणो सुरु राहणार, सार्वजनिक परिवहन सेवा १०० टक्के क्षमतेने, मालवाहतुक जास्तीत ३ व्यक्तींसह, खाजगी कार, लांब पल्याला जात असतील इ पास बंधनकारक असणार, लोकल सेवा केवळ अत्यावश्यकसेवेसाठीच, अंत्यविधीसाठी २० लोकांची उपस्थिती.

काय बंद राहणारसांयकाळी ४ नंतर चित्रिकरण, हॉटेल, रेस्टॉरेन्ट, सामाजिक मेळावे, सांस्कृतिक करमणुक  बंद राहणार,लोकल सेवा बंद, अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद, मॉल्स, शॉपींग सेंटर बंद, जमावबंदी, संचारबंदी कायम राहील.

टॅग्स :thaneठाणे