शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: ठाणे जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या  कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती, बाळ बाळंतिण सुखरूप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:58 IST

गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता कल्याण येथील २५ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेची या रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

ठाणे -  दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड १९ पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन (शस्त्रक्रिया) डिलिव्हरीची घटना ताजी असताना शनिवारी पहाटे आणखी एका पॉझिटिव्ह महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली असून तिने साडेतीन किलो वजनाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मायलेकांची प्रकृती स्थिर असून नवजात बालकाचा लवकर स्वॅब घेण्यात येईल, अशी माहिती या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली.गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता कल्याण येथील २५ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेची या रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर ठाण्याच्या इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या एका २७ वर्षीय महिलेला उपचारार्थ दाखल केले होते. ती गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तिच्यावर विशेष लक्ष ठेवले होते. अचानक शनिवारी पहाटे तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यानुसार तिची पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ही कोविड १९ पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची जिल्हा रुग्णालयातील दुसरी डिलिव्हरी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. डिलिव्हरीनंतर त्या दोन्ही बालकांना मातांनी लगेच स्तनपान सुरू केले असून पहिल्या जन्माला आलेल्या मुलीचा स्वॅब कोरोना टेस्टसाठी घेतला असून आज जन्माला आलेल्या बालकाचा स्वॅब लवकरच घेतला जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आणि फिजिशियन डॉ. नेताजी मुळीक, डॉ सृजित शिंदे, डॉ.प्रसन्ना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अर्चना आखाडे यांनी ही डिलिव्हरी केली यावेळी डॉ. शोभना चव्हाण उपस्थित होत्या.प्रसूती तसेच डायलेसिस याचे रुग्ण येण्याची शक्यता ओळखून रुग्णालयात त्याप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी दुसरी डिलिव्हरी करण्यात आली असून बाळ-बाळंतिणीची प्रकृती स्थिर आहे.तसेच या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेची ही दुसरी डिलिव्हरी असून ती नॉर्मल केली आहे. - डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल